भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेतील (T-20 Series) दुसरा सामना शुक्रवारी रांची येथे खेळवला जाणार आहे. हा सामन्याकडे निर्णायक सामना म्हणून पाहिले जात आहे. या सामन्यासह मालिका काबीज करण्याची टीम इंडियाला संधी असेल, तर मालिका वाचवण्यासाठी न्यूझीलंडला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. जयपूरमध्ये विजयाची नोंद करत टीम इंडिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे, असे असूनही, प्लेइंग 11 मध्ये बदल केले जाऊ शकतात. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात कोणत्या खेळाडूंसोबत खेळू शकते हे जाणून घेऊया.
तारीख – 19 नोव्हेंबर
वेळा - संध्याकाळी 7 पासून सुरू
स्थळ - जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची
रांची येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या कार्यकाळाची ही चांगली सुरुवात असणार आहे. अर्थात संघाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला असला तरी दुसऱ्या सामन्यात दोन बदल केले जाऊ शकतात. मोहम्मद सिराजला गोलंदाजी करताना दुखापत झाली, तर त्याला दुसऱ्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते.
केएल राहून बऱ्याच काळापासून सतत खेळत आहे. त्याला कसोटी मालिकेतही खेळायचे आहे. अशा स्थितीत रोटेशन पॉलिसीप्रमाणे उपकर्णधार राहुलला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. याशिवाय संघात आणखी बदल केले जाऊ शकतात.
भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेट कीपर), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.