team india twitter
Sports

IND vs NZ: वरुण- कुलदीप चमकले! चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतीय संघासमोर इतक्या धावांचं आव्हान

India vs New Zeland 1st Inning, Champions Trophy Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या फायनलच्या सामन्यात भारतीय संघातील फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत.

या सामन्यात न्यूझीलंडचा संघ नाणेफेक जिंकून प्रथन फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकअखेर २५१ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २५२ धावा करायच्या आहेत.

दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने पहिल्या डावात फलंदाजी करुन भारतासमोर मोठं आव्हान ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला होता. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांना असं काही करता आलं नाही.

न्यूझीलंडकडून विल यंग आणि रचिन रविंद्र ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली होती. न्यूझीलंडला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. विल यंग स्वस्तात माघारी परतला. त्याला वरुण चक्रवर्तीने बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर कुलदीप यादवने न्यूझीलंडला लागोपाठ २ धक्के दिले. रचिन रविंद्र ३७ धावांवर तंबूत परतला. तर केन विलियम्सन अवघ्या ३७ धावांवर माघारी परतला.

सुरुवातीचे ३ फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर,डॅरील मिचेलने जबाबदारी सांभाळली. त्याने ६३ धावांची खेळी केली. तर टॉम लेथम अवघ्या १४ धावा करत माघारी परतला. मिचेलच्या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने २०० धावांचा पल्ला गाठला. शेवटी मायकल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनरे महत्वपूर्ण खेळी करत न्यूझीलंडची धावसंख्या २५१ वर पोहोचवली.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, वरुण चक्रवर्तीने २ आणि कुलदीप यादवने २ गडी बाद केले. तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघाची प्लेइंग ११: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, मोहम्मद शमी

न्यूझीलंडची प्लेइंग ११: रचिन रवीद्र, विल यंग, केन विल्यमसन, डॅरेल मिचेल, टॉम लेथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), कायल जेमीसन, नॅथन स्मिथ, विल ओरूर्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT