rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Record: सामन्याआधीच रोहितच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; ब्रायन लाराची केली बरोबरी

Rohit Sharma Record: भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे टॉस गमावताच नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. दोन्ही संघ २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्यासाठी आमनेसामने आले आहेत. या सामन्यातही कर्णधार रोहित शर्माने टॉस गमावला. टॉस गमावताच कर्णधार रोहित शर्माने नकोशा रेकॉर्डमध्ये वेस्टइंडीजच्या दिग्गज खेळाडूची बरोबरी केली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यातही रोहितला नशिबाने काही साथ दिली नाही. पुन्हा एकदा रोहित टॉस उडवण्यासाठी आला आणि त्याने पुन्हा एकदा टॉस गमावला. एखादी गोष्ट सातत्याने होण्याची शक्यता खूप कमी असते.

मात्र रोहितने त्याचीही मर्यादा ओलांडली आहे. रोहितने एकापाठोपाठ एक असे ११ टॉस गमावले आहेत. असं काही होण्याची शक्यता १०० पैकी ०.५ टक्के इतकीच असती. मात्र रोहितने हे सर्व रेकॉर्ड मोडून काढले आहेत. या रेकॉर्डमध्ये त्याने वेस्टइंडीजचे माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

रोहितकडून ब्रायन लारा यांच्या रेकॉर्डची बरोबरी

वेस्टइंडीजचे दिग्गज खेळाडू ब्रायन लारा यांनी वनडे क्रिकेटमध्ये ऑक्टोबर १९९८ पासून ते मे १९९९ पर्यंत सलग १२ वेळेस टॉस गमावला होता. आता रोहितने देखील सलग १२ वेळेस टॉस गमावला आहे. या यादीत नेदरलँडचा माजी कर्णधार पीटर बोरेने दुसऱ्या स्थानी आहे. पीटर बोरेनने मार्च २०११ ते ऑगस्ट २०१३ दरम्यान सलग ११ वेळेस टॉस गमावला होता.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघाची प्लेइंग ११: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, मोहम्मद शमी

न्यूझीलंडची प्लेइंग ११: रचिन रवीद्र, विल यंग, केन विल्यमसन, डॅरेल मिचेल, टॉम लेथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), कायल जेमीसन, नॅथन स्मिथ, विल ओरूर्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : क्षुल्लक कारणावरून सुरू झालं भांडण नंतर दे दणादण; त्या हॉटेलबाहेर नेमकं काय घडलं?

Box Office Collection: बॉलिवूड अन् हॉलिवूडमध्ये काटें की टक्कर; 'बागी 4', 'द बंगाल फाइल्स', 'द कॉन्ज्यूरिंग' कोणी मारली बाजी?

Health Care Tips : बोटात अंगठी अडकली? झटपट करा 'हा' उपाय

Nagpur : दुचाकी जाताना अचानक १३० वर्षे जुनी भिंत कोसळली, नागपूरमधील काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Beauty Tips : सुंदर अन् लांबसडक पापण्या हव्यात? करा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT