Ind vs Nz live Toss and playing 11 Saam Tv
Sports

Ind vs Nz live : रोहित पुन्हा टॉस हरला, न्यूझीलंड करणार बॅटिंग, विराट प्लेईंग ११ मध्ये आहे की नाही? पाहा दोन्ही संघाचे शिलेदार

Ind vs Nz Final Toss Live : भारत विरुद्ध न्यूझीलंड हा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना दुबईमध्ये खेळला जाणार आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Yash Shirke

Ind vs Nz Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना आज दुबईमध्ये खेळला जाणार आहे. सामना सुरु होण्यापूर्वी टॉस झाला. हा टॉस न्यूझीलंडच्या कर्णधाराने जिंकला. मिचेल सँटनरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच भारत विरुद्ध न्यूझीलंड महामुकाबल्याला सुरुवात होणार आहे. ग्रुप स्टेजनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहेत.

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ग्रुप स्टेजमधील ३ आणि उपांत्य फेरीतील १ असे ४ सामने भारताने जिंकले आहेत. आता भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. भारताप्रमाणे न्यूझीलंडने देखील स्पर्धेत चांगला खेळ केला आहे. त्यामुळे आजचा हायवॉल्टेज सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारताची प्लेईंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, मोहम्मद शमी

1 Rohit Sharma (capt), 2 Shubman Gill, 3 Virat Kohli, 4 Shreyas Iyer, 5 Axar Patel, 6 KL Rahul (wk), 7 Hardik Pandya, 8 Ravindra Jadeja, 9 Kuldeep Yadav, 10 Mohammed Shami, 11 Varun Chakravarthy

न्यूझीलंडची प्लेईंग ११

रचिन रवीद्र, विल यंग, केन विल्यमसन, डॅरेल मिचेल, टॉम लेथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), कायल जेमीसन, नॅथन स्मिथ, विल ओरूर्क

1 Will Young, 2 Rachin Ravindra, 3 Kane Williamson, 4 Daryl Mitchell, 5 Tom Latham (wk), 6 Glenn Phillips, 7 Michael Bracewell, 8 Mitchell Santner (capt), 9 Kyle Jamieson, 10 Nathan Smith, 11 Will O'Rourke

विराट कोहली काल सरावादरम्यान जखमी झाला होता. त्यामुळे तो आजचा सामना खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भारताच्या प्लेईंग ११ मध्ये एकही बदल झालेला नाही. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडच्या संघात बदल झाला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरीला दुखापत झाली होती. त्यामुळे मॅट हेनरीच्या जागी नॅथन स्मिथला संधी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT