mohammed siraj  twitter
क्रीडा

IND vs NZ 1st Test: फुल ऑन राडा! मोहम्मद सिराज LIVE सामन्यात कॉनव्हेला भिडला- VIDEO

Ankush Dhavre

India vs New Zealand 1st Test: बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला.

भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला. दरम्यान भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना मोहम्मद सिराज न्यूझीलंडच्या डेवोन कॉनव्हेला भिडल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

तर झाले असे की, भारतीय संघाचा डाव ४६ धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडकडून डेवोन कॉनव्हे आणि टॉम लेथमची जोडी मैदानावर आली. ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसून आले. त्याच खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टिचून फलंदाजी केली. दोघांनी शानदार सलामी देत ६७ धावांची भागीदारी केली.

न्यूझीलंडची फलंदाजी सुरु असताना भारतीय संघाकडून १५ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता. सिराज पूर्ण जोर लावून चेंडू फेकत होता. मात्र कॉनव्हे डिफेन्सिव्ह मोडमध्ये होता. त्याने सिराजच्या या षटकात चौकार मारला. त्यानंतर सिराज भडकला. सिराज प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर कॉनव्हेच्या जवळ जात होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भारताचा डाव ४६ धावांवर आटोपला

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना २० धावा करणारा रिषभ पंत हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कारण संघातील ५ फलंदाज शून्यावर माघारी परतला.

भारतीय संघाकडून विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, आर अश्विन आणि रविंद्र जडेजा हे फलंदाज शून्यावर माघारी परतले. तर यशस्वी जयस्वालने १३ धावांची खेळी केली. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पुण्याच्या इंदापूर मधून तानाजी शिंगाडे यांना रासपची उमेदवारी

voters registration Last Date : आताही मतदार नोंदणी करता येईल का? सविस्तर माहिती एका क्लिकवर

Jungle Trekking : जंगल ट्रेकिंगचा आनंद घ्यायचाय? मग वासोटा किल्ला आहे परफेक्ट ऑप्शन

VIDEO : भाजप आमदारांची जागा धोक्यात? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Pune News : मंत्री तानाजी सावंत यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाच्या बंदूकीतून गोळीबार

SCROLL FOR NEXT