Sports

IND vs NZ, 1st Test, Day 2, Highlights: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडकडे 134 धावांची आघाडी

IND vs NZ, 1st Test : भारताचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपल्यानंतर मैदानात उतरलेल्या किवीच्या संघाने १८० धावा केल्या आहेत.

Bharat Jadhav

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. बेंगळुरू कसोटीचा दुसरा दिवस भारतीय संघासाठी चांगला ठरला नाही. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा टीम इंडियाचा निर्णय महागात पडला. भारतीय संघ अवघ्या ४६ धावांत आटोपला. घरच्या मैदानावर हा सर्वात कमी स्कोअर आहे.

भारतीय संघाच्या ५ फलंदाजांना साधं खाते सुद्धा उघडता आले नाही. न्युझीलंडच्या संघाकडून मॅट हेनरीने ५ विकेट घेतल्या. तर जलदगती गोलंदाज वि ओरूकेने ४ विकेट घेतल्या. यानंतर मैदानात उतरलेल्या न्युझीलंडच्या संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपपर्यंत ३ विकेट गमावत १८० धावा केल्या. या प्रकारे किवीच्या संघाने १३४ धावांची आघाडी घेतली आहे. किवीच्या संघाकडून डेवन कॉनवेने ९१ धावांची खेळी केली तर रचिन रविंद्र आणि डेरिल मिचेल हे अजून नाबाद आहेत.

मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडच्या लेथम आणि कॅनवे यांनी चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी ६७ धावांची भागदारी केलीय. कर्णधार लेथमने १५ धावा केल्या. विल यंग आणि कॅनवे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७५ धावा केल्या. कॅनवे ९१ धावा करत बाद झाला. त्याला अश्विनने क्लिन बोल्ड करत बाद केले. रचिन रवींद्र २२ आणि मिशेल १४ धावा करून क्रीजवर आहेत. न्यूझीलंडच्या डाव चालू असतांना ऋषभ पंत जखमी होऊन मैदानाबाहेर गेला. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. ध्रुव जुरेलला त्याच्या जागी यष्टीरक्षक म्हणून बोलवण्यात आले आहे.

भारताकडून कुलदीप, जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी १ बळी घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि सातव्या षटकात कर्णधार रोहित शर्माला (२) टीम साऊदीने त्रिफळाचीत करून न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. यानंतर विराट कोहली आणि सरफराज खान शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले (0). यादरम्यान पाऊस सुरू झाल्याने खेळ काही काळ थांबला होता. विराटला विल्यम ओरूर्कने आणि सरफराजला मॅट हेन्रीने बाद केले.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु २१ व्या षटकात विलियम ओरूकेने यशस्वी जायस्वालला १३ धावांवर बाद केलं. त्यानंतर भारताच्या एकामागून एक विकेट पडत राहिल्या. ऋषभ पंतने सर्वाधिक २० धावा केल्या. दरम्यान भारताचे ९ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाहीये. आणि भारताचा संपूर्ण संघाने ३१.२ षटकात ४६ धावांवर आपला गाशा गुंडाळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT