Washington Sundar Excellent Catch
Washington Sundar Excellent Catch Saam TV
क्रीडा | IPL

Washington Sundar Catch : सुंदरचा अतिसुंदर झेल, पाहून सगळेच अवाक्, सुपरमॅन वॉशिंग्टनचा VIDEO पाहाच

Satish Daud-Patil

IND Vs NZ 1st T20 Washington Sundar Excellent Catch : रांचीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याला सुरूवात झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडने दमदार सुरूवात केली आहे. सुरूवातीच्या दोन षटकांत सलामीवीर फिन ॲलन आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने भारताच्या जलदगती गोलंदाजांची सुरुवातीच्या षटकातच हवा काढली.  (India vs New Zealand 1st T20I)

त्यामुळे टीम इंडियाचा  (Team India) कर्णधार हार्दिक पांड्या याने नवा डाव टाकत तिसरं षटक फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला दिलं. सुंदरने अतिशय सुंदर गोलंदाजी करत ५ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. यात एका जबदस्त कॅचचा देखील समावेश होता.

वॉशिंग्टन सुंदरने आपले पहिले दोन चेंडू अप्रतिम वळवले. सुंदरची गोलंदाजी कशी खेळावी, यावर किवी फलंदाजांना तोडगा सापडत नव्हता, त्यातच मोठा फटका मारण्याच्या नादात सलामीवर फिन अँलन सीमारेषेजवळ झेल देऊन बसला.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या मार्क चँपमेनला देखील सुंदरची गोलंदाजी खेळता आली नाही. डिफेन्स करण्याच्या नादात तो सुंदरला त्याच्याच गोलंदाजीवर झेल देऊन बसला. वाशिंग्टन सुंदरने सुपरमॅन बनत असा कॅच पकडला आहे. जो बघून न्यूझीलंडच्या स्टाफसह भल्याभल्यांनी आपल्या तोंडात बोटं घातली. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, वन डे मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ)  ट्वेंटी-२० मालिकेत कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिला सामन्यात हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, जितेश शर्मा व पृथ्वी शॉ यांना आजच्या सामन्यात संधी दिलेली नाही. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT