yashasvi jaiswal alastair cook twitter
क्रीडा

Yashasvi Jaiswal Sixes: जयस्वालचे १२ षटकार पाहून ॲलिस्टर कुकही झाला शॉक! एकाच इनिंगमध्ये मोडला १६१ सामन्यांचा रेकॉर्ड

Alastair Cook On Yashasvi Jaiswal: कसोटीतील एका इनिंगमध्ये या पठ्ठ्याने १२ षटकार लगावले. यासह त्याने कसोटी क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या रेकॉर्डची बरोबरी देखील केली.

Ankush Dhavre

Alastair Cook On Yashasvi Jaiswal:

राजकोटच्या मैदानावर यशस्वी नावाचं वादळ आलं होतं. यशस्वी जयस्वालने तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत नाबाद २१४ धावांची खेळी केली. आपल्या या खेळीदरम्यान त्याने षटकारांचा पाऊस पाडला.

कसोटीतील एका इनिंगमध्ये या पठ्ठ्याने १२ षटकार लगावले. यासह त्याने कसोटी क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या रेकॉर्डची बरोबरी देखील केली. दरम्यान या आक्रमक खेळीनंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने केलेलं वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकने टीएनटी स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' मी जितके षटकार माझ्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत नाही मारू शकलो तितके षटकार यशस्वीने आज एका इनिंगमध्ये मारले आहेत. यशस्वी जयस्वालने या सामन्यात चौफेर फटकेबाजी करत १२ षटकार मारले. तर १६१ कसोटी सामने खेळणाऱ्या ॲलिस्टर कुकला आपल्या कारकीर्दीत केवळ ११ षटकार मारता आले. षटकार कमी मारले असतील तरी त्याने चौकार मात्र १४४२ मारले आहेत. (Cricket news in marathi)

यशस्वी जयस्वालचा जलवा..

यशस्वी जयस्वालने या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत एकूण १२ षटकार मारले. यासह तो कसोटी क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

तसेच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने वसीम अक्रमच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. वसीम अक्रमने देखील कसोटीतील एकाच डावात १२ षटकार मारले होते.

यासह यशस्वी जयस्वालच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. यशस्वी जयस्वालने या मालिकेत २० षटकार मारले आहेत. एकाच कसोटी मालिकेत २० षटकार मारणारा तो पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT