team india saam tv news
Sports

IND vs ENG: या ३ भारतीय खेळाडूंना भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत संधी मिळणं कठीण; फॉर्ममध्ये असूनही बसावं लागेल बाकावर

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये येत्या २५ जानेवारीपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

India vs England, 1st Test: 

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी मालिकेला २५ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. भारतातील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते.

त्यामुळे भारतात येऊन भारतीय संघाला हरवणं मुळीच सोपं नसणार आहे २०१२ मध्ये इंग्लंडने भारतीय संघाला न पचणारं दु:ख देत २-१ ने कसोटी मालिका जिंकली होती. मात्र २०१२ नंतर भारतीय संघाने मायदेशात खेळताना एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.

या मालिकेतील सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय संघात ३ असे खेळाडू आहेत त्यांना प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणं कठीण आहे.

१. कुलदीप यादव..

भारतीय संघातील चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण आहे. या मालिकेत त्याला एकही कसोटी सामना खेळायला मिळणं कठीण आहे.

कारण इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आर अश्विन आणि रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संघात स्थान दिलं गेलं आहे. हे तिन्ही खेळाडू गोलंदाजीसह फलंदाजीतही मोलाचं योगदान देऊ शकतात. कुलदीप यादव गोलंदाज तर चांगला आहे मात्र फलंदाजीत तो कुठेतरी कमी पडतो.

२. आवेश खान..

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज आवेश खानला देखील या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळणं कठीण आहे. या मालिकेत भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाज तर २ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतो.

फिरकी गोलंदाज तर ठरलेले आहेत. वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. (Latest sports updates)

३. ध्रुव जुरेल...

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी २२ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र त्याला या मालिकेत प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण आहे. कारण संघात केएस भरत आणि केएल राहुलसारखे अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे संपूर्ण मालिकेत त्याला बाकावर बसून राहावं लागेल.

इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक),आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fennel Seeds Benefits: जेवणानंतर बडीशेप खाता? जाणून घ्या रोज बडीशेप खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Cabinet Meeting: अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10 टक्के आरक्षण; राज्य सरकारनं घेतले १० महत्त्वाचे निर्णय

आजोबा-पणजोबांची जमीन नक्की कुठे अन् किती आहे? एका क्लिकवर शोधा ७/१२ अन् जमिनीचा नकाशा

Maharashtra News Live Update: चाकणमधील कंपनीला भीषण आग

Honeymoon Destinations: डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन करताय? ५ ड्रीम डेस्टिनेशन्स समोर परदेशही वाटेल फिका

SCROLL FOR NEXT