virat kohli saam tv news
Sports

Virat Kohli: 'विराटचा अहंकार वाढलाय..'भारतात येण्यापूर्वीच इंग्लंडच्या गोलंदाजाचा किंग कोहलीशी पंगा

Olie Robinson On Virat Kohli: येत्या २५ जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

Olie Robinson On Virat Kohli:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ जानेवारीपासून हैदराबादच्या मैदानावर रंगणार आहे. २१ जानेवारी रोजी इंग्लंडचा संघ पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी भारतात दाखल होणार आहे.

भारतीय संघाने या मालिकेतील सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. दरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने विराट कोहलीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

इएसपीएनक्रीकइन्फोवर बोलताना ऑली रॉबिन्सन म्हणाला की, ' प्रत्येक खेळाडूला सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळायचं असतं, बरोबर ना? आणि त्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला बादही करायचं असतं. कोहली त्यापैकीच एक आहे. कोहली अहंकारी आहे. भारतात खेळणं, जिथे विराटला धावा करून वर्चस्व गाजवायचं आहे. हे शानदार असेल.'

ऑली रॉबिन्सनने भारतीय संघाविरुद्ध ४ कसोटी सामने खेळले आहेत. मात्र भारतात येऊन खेळण्याची ही त्याची पहिलीच वेळ असणार आहे. त्याचं असं म्हणणं आहे की, जर त्याने या दौऱ्यावर चांगली कामगिरी केली तर त्याचं संघातील स्थान निश्चित होऊ शकतं. याबाबत बोलताना तो म्हणाला की,' जर या मालिकेत चांगली कामगिरी केली तर माझं संघातील स्थान निश्चित होऊ शकतं.' (IND vs ENG News In Marathi)

या मालिकेतील सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार) श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग, ठाकरेंचे खासदार शिंदे गटात जाणार का? गैरहजर खासदाराने मोजक्या शब्दात सांगितलं

Mumbai Pune : High-Speed रेल्वेचा ३८० प्रति किमीचा स्पीड, मुंबई ते पुणे प्रवास पूर्ण होणार फक्त ४८ मिनिटात

Chanakya Niti: बँक खात्यात पैसा टिकवायचा असेल तर या 5 ठिकाणी बना महाकंजूस, आचार्य चाणक्यांनी दिला खास सल्ला

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये पाऊस लांबल्याने हळद पिकाला तुषार सिंचनाचा आधार

Weight Loss: पोटावरील हट्टी चरबी कमी करायची आहे? रोज करा हे 5 सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT