India vs England Test Series  x/BCCI
Sports

Ind Vs Eng Test : कसोटी मालिका संपली, पण वाद संपेनात! भारताच्या महान क्रिकेटपटूचा अपमान केला?

India Vs England Test : भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेला अँडरसन-तेंडुलकर नाव दिलं खरं, पण हे दोघेही दिग्गज खेळाडू अखेरच्या सामन्यानंतर ट्रॉफी प्रेंझेंटेशनला उपस्थित नव्हते. सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळं आता हा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

Nandkumar Joshi

  • भारत-इंग्लंड कसोटी मालिका संपल्यानंतरही वाद संपेनात

  • तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीला नाव दिलं, पण योग्य सन्मान नाही

  • सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांचा संतप्त सवाल

  • दोन्ही दिग्गज खेळाडू प्रेझेंटेशनला मंचावर उपस्थित नव्हते

भारतीय संघ ज्यावेळी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळतो त्यावेळी त्या मालिकेचं नाव पटौदी ट्रॉफी असायचं आणि इंग्लंडचा संघ भारतात कसोटी मालिका खेळायचा होता त्यावेळी त्या मालिकेचं नाव एंथनी डी मेलो ट्रॉफी असायचं. पण यापुढं असं काहीच होणार नाही. कारण याची सुरुवात भारत-इंग्लंड यांच्यात २०२५ मध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून झाली आहे. आता अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असं मालिकेचं नाव आहे. त्याचं पहिलं पर्व झालंय. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. ही मालिका संपली असली तरी, वाद काही संपेनात. आता या ट्रॉफीला नाव तर अँडरसन-तेंडुलकर दिलं गेलं, पण या दिग्गजांचा योग्य सन्मान करण्यात आला नाही, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत खेळाडूंमध्ये 'घमासान' बघायला मिळालं. इंग्लंडनं विजयानं मालिकेची सुरुवात केली, पण भारतानं विजयानं शेवट केला. या पाच कसोटी सामन्यांत मैदानावर खेळाडू एकमेकांना भिडले. भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीर देखील आक्रमक झाला होता. त्यानं भरमैदानात पीच क्यूरेटरला हातवारे करून झापलं होतं. अखेरचा सामना संपला आणि ही मालिकाही संपली आहे. पण या मालिकेतील वाद काही संपेनात. क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर आणि गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावानं ही ट्रॉफी आहे, तर मग ही मालिका संपल्यानंतर ट्रॉफी प्रेझेंटेशनला मंचावर उपस्थित का नव्हते, असा सवाल विचारला जात आहे.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज अँडरसन या दोघांचा हा अपमान आहे, अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून दिल्या जात आहेत. ट्रॉफी त्यांच्या नावानं, पण त्यांना योग्य सन्मान दिला नाही. किमान दोघे प्रेझेंटेशनला उपस्थित हवे होते. हा दोघांचाही अवमान आहे, असा संताप सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयनं या ट्रॉफीचं नाव बदललं. पटौदी कुटुंबीयांच्या भावना लक्षात घेऊन पटौदी मेडल विजेत्या संघाच्या कर्णधाराला देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन आणि पटौदी कुटुंबीयांपैकी कुणीही अखेरच्या कसोटी सामन्यानंतर प्रेझेंटेशनला मंचावर उपस्थित नव्हता, त्यामुळं आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि भारतीय कर्णधार शुभमन गिल हे दोघेच ट्रॉफीसह मंचावर होते. पण अन्य मालिकांमध्ये असं कधी झालेलं पाहायला मिळालं नाही, असं चाहत्यांचं म्हणणं आहे. बॉर्डर - गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलियानं जिंकली त्यावेळी एलन बॉर्डर यांना ट्रॉफी प्रदान करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. भारतात सुनील गावसकर यांनी विजेता संघ भारताला ट्रॉफी देऊन सन्मानित केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chicken Shops : चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद राहणार; स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा झटका, वरिष्ठ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी खरी ठरली, भारतावर आणखी २५ टक्के टॅरिफ|VIDEO

Thursday Remedies: आर्थिक प्रगती आणि धनलाभासाठी गुरुवारी करा 'हे' विशेष उपाय

Maharashtra Live News Update: डोनाल्ड ट्र्म्प् यांनी भारतावर पुन्हा लावला 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ

SCROLL FOR NEXT