Ind Vs Eng 
Sports

Ind Vs Eng: पहिल्या कसोटीतील पराभवानंतर गिल संतापला; 'या' खेळाडूंना सुनावलं

Shubman Gill Reaction After Loss First Test Match: पराभवानंतर कर्णधार गिलनं भारतीय खेळाडूंवर आगपाखड केली. संघामधील खालच्या पातळीमधील खेळाडूंना त्याने सुनावले आहे.

Bharat Jadhav

इंग्लंडच्याविरुद्धात झालेल्या पहिल्या कसोटीत भारताचा दारूण पराभव झाला. इंग्लंडनं पाच विकेट राखत भारतीय संघाला पराभूत केलं. या पराभवानंतर भारतीय कर्णधार शुबमन गिलनं भारतीय खेळाडूंवर आगपाखड केली. संघामधील खालच्या पातळीमधील खेळाडूंना कर्णधार गिलनं चांगलेच खडेबोल सुनावले.

उपकर्णधार रिषभ पंतने दोन्ही डावात शतके झळकावली तर गिल, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनीही शतके केली. परंतु भारत दोन्ही डावात अपेक्षित मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. कारण भारतीय संघाची खालची फळी पूर्णतः अपयशी ठरली. त्यानंतर क्षेत्ररक्षणात खेळाडूंनी क्रिकेट चाहत्यांना नाराज केलं. भारतीय खेळाडूंनी अनेक महत्त्वाचे झेल सोडले. त्याचा परिणाम भारताला पहिली कसोटी गमावावी लागली.

पहिल्या डावात तीन विकेटच्या मोबदल्यात ३५९ धावा केल्यानंतर संपूर्ण संघ ४७१ धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावातही शेवटच्या सहा विकेट अवघ्या ७७ धावांच्या आत पडल्या. कसोटी सामना झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कर्णधार गिलने पराभवाची कारणं सांगितली. यावेळी त्याने संघातील खालच्या क्रमावरील खेळाडूंना खडेबोल सुनावले.

हा एक उत्तम कसोटी सामना होता. आमच्याकडे संधी होत्या पण आम्ही कॅच सोडल्या. खालच्या फळीतही धावा झाल्या नाहीत, पण मला संघाचा अभिमान आहे. एकंदरीत पाहिला तर हा एक चांगला प्रयत्न होता. काल आम्ही सुमारे ४३० धावा केल्यानंतर डाव घोषित करण्याचा विचार करत होतो पण खालच्या फळीत धावा नसल्याने ते कठीण झालं.

आम्ही खालच्या फळीबाबत बोलताना गिल म्हणाला, खालच्या फळीतील विकेट्स खूप खूप लवकर पडल्या. येणाऱ्या सामन्यांमध्ये आम्हाला यात सुधारणा करावी लागेल. भारतीय संघाच्या खेळाडूंकडून अनेक कॅच सुटल्या. त्यामुळे संघाला पराभव पत्कारावा लागला. पण कर्णधार गिलनं मात्र क्षेत्ररक्षणाबाबत संघाची पाठराखण केली. क्षेत्ररक्षकांचा बचाव करताना तो म्हणाला, "अशा विकेटवर संधी सहज मिळत नाहीत. हा एक तरुण संघ आहे आणि शिकत आहे. भविष्यात या पैलूंमध्ये चांगली कामगिरी होईल, अशी आशा असल्याचं गिल म्हणाला.

बुमराहच्या उपलब्धतेबद्दल गिलला प्रश्न करण्यात आला होता. "आम्ही सामना-दर-सामना पाहू. दुसरी कसोटी जवळ आल्यावर निर्णय घेतला जाईल.२ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी वेळ आहे आणि सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहबद्दल निर्णय घेतला जाईल, असं गिल म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

SCROLL FOR NEXT