IND vs ENG: अँडरसनच्या भेदक गोलंदाजी समोर फलंदाजांची गळती तर इंग्लंडची नाबाद सुरवात Saam Tv
Sports

IND vs ENG: अँडरसनच्या भेदक गोलंदाजी समोर फलंदाजांची गळती तर इंग्लंडची नाबाद सुरवात

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर नांग्या टाकले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

IND vs ENG 3rd Test : भारत India आणि इंग्लंड England यांच्यात हेडिंग्ले Headingley येथील लीड्स Leeds या ठिकाणी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर अक्षरशा नांग्या टाकले आहेत. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावामधेच टीम इंडिया अवघ्या ७८ धावांवर ऑल आऊट झाली आहे. इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचे ९ खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकलेला नाही.

हे देखील पहा-

भारतीय संघाने आपले शेवटील ५ फलंदाज फक्त ११ धावांवर गमावले आहेत. रोहित शर्मा- १९ आणि अजिंक्य रहाणे- १८ सोडले, तर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. भारताच्या डावात केएल राहुल- ०, चेतेश्वर पुजारा- १, विराट कोहली- ७, ऋषभ पंत- २, रवींद्र जडेजा- ४, मोहम्मद शमी- ०, जसप्रीत बुमराह- ० आणि मोहम्मद सिराज यांनी ३ धावा काढले आहेत.

तर इशांत शर्मा हा ८ धावांवर नाबाद राहिलेला आहे. इंग्लंडने अतिरिक्त १६ धावा दिले अन्यथा भारतीय संघ हा ६२ धावांवर सर्वबाद झाला असता. इंग्लंडविरुद्ध भारताची ही तिसरी सर्वात नीचांकीची धावसंख्या आहे. या अगोदर १९७४ मध्ये लॉर्ड्स Lords कसोटीत भारत ४२ आणि १९५२ मध्ये मँचेस्टरमध्ये ५८ धावांवर ऑलआऊट करण्यात आले होते. कसोटी क्रिकेटमध्ये भारताची ही ९ वी सर्वात निचांकी धावसंख्या आहे.

मागील वर्षी ऑस्ट्रेलिया Australia दौऱ्यावर अॅडलेडमध्ये Adelaide टीम इंडिया फक्त ३६ धावांवर ऑलआऊट करण्यात आली होती. दरम्यान भारताच्या पहिल्या डावातील प्रत्युत्तरामध्ये इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज हसीब हमीद Haseeb Hameed ​आणि रोरी बर्न्स यांनी शतकीची भागीदारी रचलेली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा इंग्लंडने एकही विकेट न गमावता १२० धावा केले होते. त्यांच्याकडे आता ४२ धावांची आघाडी आहे. बर्न्स ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५२ आणि हमीद ११ चौकारांसह ६० धावांवर नाबाद आहे. आज दुसऱ्या दिवशी इंग्लंड भक्कम आघाडी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT