भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील २ सामने झाले असून मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर भारत आणि इंग्लंडचा संघ महाराष्ट्रात येणार आहे.
पुढील दोन्ही सामने पुणे आणि मुंबईत होणार आहे. दरम्यान पुण्यात होणाऱ्या सामन्यासाठी तिकीट विक्री सुरु झाली होती. मात्र अवघ्या काही तासातच तिकीट संपल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी (३१ जानेवारी) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गाहुंजे स्टेडियमवर रंगणार आहे. पुण्यात भारत- इंग्लंडच्या सामन्याची तिकीटं विक्रीसाठी काढताच अवघ्या काही मिनिटात ही तिकीट संपल्याची माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष रोहित पवार यांनी दिली.
रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, 'पुण्यात #MCA च्या गहुंजे येथील स्टेडियमवर होणाऱ्या INDIA vs ENGLAND मॅचला तुफान प्रतिसाद मिळाल्याने सर्व तिकिटांची आधीच विक्री झाली आणि इच्छा असूनही अनेकांना तिकिटं मिळू शकली नाहीत याचं वाईट वाटतं, पण ज्यांना तिकिट मिळालं त्या भाग्यवान क्रिकेट रसिकांचं मनापासून अभिनंदन!'
तसेच त्यांनी ट्वीट करत भारतीय संघाला पुण्यात होणाऱ्या सामन्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की,' INDIA vs ENGLAND ही मॅच आपल्या आपल्या पुण्यात आणि तेही #MCA च्या स्टेडियमवर होत असल्याने याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. त्यामुळे टिव्हीवर बघत असलेल्या इंटरनॅशनल मॅचचा थरार आता प्रत्यक्ष मैदानावर अनुभवता येणार आहे. या मॅचसाठी टीम इंडियाला विजयासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.