भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार राजकोटच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४४५ धावा केल्या आहेत. या धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने अवघ्या ३५ षटकात २०९ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत आहे. दरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी सामना सुरू असताना आर अश्विन सामन्यातून बाहेर झाला आहे.
तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आर अश्विनने इंग्लंडला पहिला धक्का देत कसोटी क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करण्याचा रेकॉर्ड केला. मात्र याच दिवशी तो कौटुंबिक कारणास्तव घरी परतला आहे. बीसीसीआयने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, ' आर अश्विन कौटुंबिक कारणास्तव कसोटीतून बाहेर झाला आहे. या कठीण काळात बीसीसीआय आणि भारतीय संघ अश्विनच्या पाठीशी आहे. गरज पडल्यास बीसीसीआय हवी ती मदत करण्यास तयार आहे.' (Cricket news in marathi)
इंग्लंडचे फलंदाज बॅझबॉल मोडमध्ये आहेत. आर अश्विन इंग्लडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवू शकतो. मात्र तो आता या कसोटीतून बाहेर झाला आहे. आर अश्विन बाहेर होणं हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. कारण तो चांगल्याच रिदममध्ये दिसून आला आहे.
अश्विन बाहेर झाल्याने भारतीय गोलंदाजी आक्रमणाची ताकद निम्मी झाली असं म्हणणं वावग ठरणार नाही. भारतीय संघाने केलेल्या ४४५ धावांचा पाठलाग करताना २०९ धावा केल्या आहेत. सलामीवीर फलंदाज बेन डकेट १३३ धावांवर नाबाद आहे. सामन्याचा तिसरा दिवस हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण इंग्लंडला लवकरात लवकर ऑल आऊट केलं नाही तर हे भारतीय संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकतं.
आता भारतीय संघाला आर अश्विनशिवाय मैदानावर उतरावं लागणार आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाजीची धुरा रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या खांद्यावर असणार आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.