भारताचा कर्णधार रोहित शर्मा फॉर्ममध्ये कधी परतणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो सुपरफ्लॉप ठरतोय. मात्र इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याचे रौद्ररूप पाहायला मिळाले.
या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी ३०५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि रोहित शर्मा या जोडीने भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. दरम्यान सुरुवातीला २ षटकार खेचताच कर्णधार रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधील मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
रोहित शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र त्याला हवी तशी सुरुवात मिळत नव्हती. कटक वनडेत रोहितने दुसऱ्या षटकापासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने सामन्यातील दुसऱ्याच षटकात अॅटकिंसनच्या गोलंदाजीवर मिड विकेटच्या डोक्यावरुन षटकार मारला.
रोहितचा हा षटकार रेकॉर्डब्रेकिंग ठरला आहे. रोहितने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३३२ षटकार मारले आहेत. वनडेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या रेकॉर्डमध्ये रोहित दुसऱ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे.
रोहितने अॅटकिंसनच्या षटकात आपल्या वनडे क्रिकेट कारकिर्दीतील ३३२ वा षटकार खेचला. असा रेकॉर्ड करणारा तो जगातील केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने वेस्टइंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलला मागे सोडलं आहे. ख्रिस गेलच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये ३३१ षटकार मारण्याची नोंद आहे.
तर सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहीद आफ्रिदी अव्वल स्थानी आहे. आफ्रिदीच्या नावे ३५१ षटकार मारण्याची नोंद आहे. तर श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याच्या नावे वनडेत २७०, एमएस धोनीच्या नावे २२९ आणि ओएन मॉर्गनच्या नावे २२० षटकार मारण्याची नोंद आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
शाहीद आफ्रिदी - ३५१ षटकार
रोहित शर्मा- ३३२ षटकार
ख्रिस गेल- ३३१ षटकार
सनाथ जयसूर्या- २७० षटकार
एमएस धोनी- २२९ षटकार
ओएन मॉर्गन - २२० षटकार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.