rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Record: पुण्यात हिटमॅन रचणार इतिहास! मिस्टर 360 चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी

India vs Bangladesh: या सामन्यात रोहित शर्माकडे मोठा रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Record:

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला सामना वगळला तर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये त्याने तुफान फटकेबाजी केली आहे. भारतीय संघाचा चौथा सामना बांगलादेश संघाविरूद्ध रंगणार आहे.

पुण्याच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यातही रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान या सामन्यात त्याला मोठा विक्रम मोडून काढण्याची संधी असणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने १३१ धावांची खेळी केली होती. तर पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातही त्याची बॅट जोरदार तळपली होती.

या सामन्यात त्याने ८६ धावा चोपल्या होत्या. आता अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माकडे एबी डिव्हीलियर्सचा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. नुकताच त्याने या बाबतीत ख्रिस गेलला मागे सोडलं आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ८६ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ३०० षटकारांचा पल्ला गाठला होता. आता बांगलादेशविरद्धच्या सामन्यात तो आणखी एक भीमपराक्रम करण्याच्या वाटेवर आहे. (Latest sports updates)

एबी डिव्हीलियर्सचा रेकॉर्ड मोडण्याची संधी..

रोहित शर्माने आतापर्यंत वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकूण ३४ षटकार मारले आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो ख्रिस गेल आणि एबी डिव्हीलियर्सनंतर तिसऱ्या स्थानी आहे. त्याला एबी डिव्हीलियर्सला मागे सोडण्यासाठी केवळ ३ षटकारांची गरज आहे. एबी डिव्हीलियर्सने वर्ल्डकप स्पर्धेत ३७ षटकार मारले आहेत. जर बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात त्याने ३ षटकार मारले तर तो एबी डिव्हीलियर्सला मागे सोडेल. ४९ षटकारांसह ख्रिस गेल या यादीत अव्वल स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT