Ind vs Ban 2nd ODI/BCCI SAAM TV
Sports

Ind vs Ban 2nd ODI : दुसऱ्या वनडेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का; बाहेर होऊ शकतो मॅचविनर खेळाडू

India vs Bangladesh 2nd ODI News : टीम इंडियाला दुसऱ्या वनडेआधीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Nandkumar Joshi

India vs Bangladesh, 2nd ODI Latest Update : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेचा दुसरा सामना बुधवारी होणार आहे. टीम इंडिया पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून पराभवाचा धक्का बसला आहे. या मालिकेत भारत १-० ने पिछाडीवर आहे. आता या सामन्यात टीम इंडिया जोरदार कमबॅक करेल अशी अपेक्षा आहे. आता दुसरा सामना होत असला तरी, त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ऑलराउंडर शार्दुल ठाकूरच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  (Sports News)

पहिल्या वनडे सामन्यात शार्दुल ठाकूर याला गोलंदाजी करताना त्रास जाणवत होता. आता तो दुसऱ्या वनडे सामन्यात खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. कारण वनडे मालिकेनंतर कसोटी मालिकाही होणार आहे. अशावेळी टीम इंडिया मॅनेजमेंट कोणतीही जोखीम पत्करण्याच्या मानसिकतेत नाही. (Latest Marathi News)

त्यामुळे शार्दुल ठाकूरला दुसऱ्या वनडे सामन्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा लागेल. आता जम्मू एक्स्प्रेस उमरान मलिक याला टीम इंडियात संधी मिळू शकते.

उमरान मलिक आतापर्यंत टीम इंडियासाठी ३ वनडे सामने खेळला आहे. त्याने आतापर्यंत तीन विकेट घेतल्या आहेत. उमरानने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पदार्पण केले होते. जर मलिकला संधी मिळाली तर, तो पहिल्यांदाच रोहित शर्मा आणि इतर वरिष्ठ खेळाडूंच्या सोबत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल.

दुसऱ्या वनडेत अशी असेल टीम इंडिया प्लेइंग ११

शार्दुल ठाकूर हा दुसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर गेला तर टीम इंडियात बदल होईल. टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन अशी असू शकेल. रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, उमरान मलिक, कुलदीप सेन, दीपक चाहर, मोहम्मद सिराज.

भारत- बांगलादेश वनडे सीरीज

पहिली वनडे - बांगलादेश १ विकेटने विजयी

दुसरी वनडे - ७ डिसेंबर, मीरपूर

तिसरा वनडे १० डिसेंबर, चटगाव

पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियानं हाराकिरी केली. भारतानं पहिली फलंदाजी करताना अवघ्या १८६ धावा केल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खोचक मारा केला. पण अखेरीस गोलंदाजी चांगली होऊ शकली नाही. अखेरचा विकेट त्यांना घेता आला नाही आणि बांगलादेशनं एका विकेटनं विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

Gopichand Padalkar : जयंत्या, जातीवंत पाटील असशील तर...; गोपीचंद पडळकर पुन्हा घसरले

CMF Headphones Pro: 100 तास प्लेबॅकसह नवीन CMF वायरलेस हेडफोन लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर उजडला, लाडकीला सप्टेंबरचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख समोर

SCROLL FOR NEXT