jasprit bumrah twitter
Sports

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

IND vs BAN, 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल केली आहे.

Ankush Dhavre

Jasprit Bumrah Clean Bowled Shadman Islam: चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात आर अश्विनची शतकी आणि रविंद्र जडेजाच्या झुंजार खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात ३७६ धावांचा डोंगर उभारला आहे.

दरम्यान या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेशला जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच मोठा धक्का दिला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशकडून पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी शदमान इस्लाम आणि जाकीर हसनची जोडी मैदानावर आली. तर भारतीय संघाकडून अनुभवी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला.

बांगलादेशने भारतीय संघाला सुरुवातीच्या एका तासात ३ मोठे धक्के दिले होते. जसप्रीत बुमराहने तर पहिल्याच षटकात बांगलादेशच्या सलामीवीर फलंदाजाची दांडी गुल केली आणि त्याला माघारी धाडलं. दरम्यान शदमान इस्लाम अवघ्या २ धावा करत माघारी परतला.

तर झाले असे की, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सुरु होता. त्यावेळी डावखूऱ्या हाताचा शदमान इस्लाम स्ट्राईकवर होता. तर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह राऊंड द विकेटने मारा करत होता. त्यावेळी बुमराहच्या षटाकातील शेवटचा चेंडू टप्पा पडला अन् काटा बदलत आत आला.

शदमान इस्लामला वाटलं की, चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेरुन निघून जाईल. मात्र त्याचा अंदाज चुकला. कारण हा चेंडू त्याची दांडी गुल करुन गेला. यासह बांगलादेशला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT