Kuldeep Yadav  Saam Tv
Sports

Kuldeep Yadav : 'चायनामॅन' कुलदीप यादवची जादू चालली, फिरकी गोलंदाजीपुढे बांग्लादेशच्या फलंदाजांनी टाकली नांगी

पहिल्या डावात ४ विकेट घेऊन कुलदीप यादवने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kuldeep Yadav News : २०१७ साली धर्मशाळा स्टेडियमवरऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध डेब्यू टेस्ट सामनाच्या पहिल्या डावात ४ विकेट घेऊन कुलदीप यादवने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. डावखुरा फिरकी गोलंदाजाने मोठ्या दिमाखात ४ गडी बाद केल्याने टीम इंडियाला नवा सूर सापडला आहे. कुलदीप सध्या आठवा कसोटी सामना खेळत आहे. २२ महिन्यांनी कसोटी सामन्यात वापसी करत कुलदीपने बांग्लादेशच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला आहे. (Latest Marathi News)

चट्टोग्राम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने (Team India) पहिल्या डावात ४०४ धावांचा डोंगर उभा केला. तर दुसरीकडे बांग्लादेशने १३३ धावा करत ८ गडी गमावले आहेत. यातील ८ पैकी ४ गडी कुलदीप यादवने घेतले आहेत. बांग्लादेशचे ४ गडी बाद केल्याने त्याच्यावर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शाकिब- मुशफिकूरला तंबूत परतवलं...

कुलदीपने दुसऱ्या दिवशी १० षटकात ३३ धावा देऊन ४ गडी बाद केले. यात बांग्लादेशच्या दोन दिग्गज फलंदाजांमध्ये कर्णधार शाकिब अल हसन आणि माजी कर्णधार मुशाफिकूर रहीमचा सामावेश आहे. २८ वर्षांच्या कुलदीपने दोघांना चांगलंच गुंडाळलं. शाकिबला झेलबाद केलं तर मुशफिकूरला पायचित केले.

दुखापतीनंतरही केली जबरदस्त गोलंदाजी

फेब्रुवारी २०२१ मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध पहिली टेस्ट खेळणाऱ्या कुलदीपने सांगितले की, 'मी जरा चिंतेत होतो की, पण माझं नशीब चांगलं की, मला पहिल्याच षटकात विकेट मिळाला. दुखापत झाल्यानंतरही गोलंदाजीवर चांगलं काम केलं आहे. त्यामुळे याचा मला फायदा झाला आहे.

फलंदाजी देखील केली तुफान

कुलदीपने केवळ ४ गडी बाद नाही केले, तर फलंदाजी तुफान केली. डावखुऱ्या कुलदीपने टीम इंडियाच्या २९३ धावानंतर तसेच ७ गडी बाद झाल्यानंतर रविचंद्रन अश्विनसोबत मिळून भारताचा डाव सावरला. दोघांनी आठव्या विकेटसाठी ९२ धावांची भागिदारी केली. कुलदीपने टेस्ट करिअरमध्ये ११४ चेंडूमध्ये ४० धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arattai App UPI: अरत्ताई अ‍ॅपवर लवकरच UPI सपोर्टसह होणार, जाणून घ्या खास फीचर्स

भूकंपामुळे मध्यरात्री जमीन हादरली, २६ जणांचा मृत्यू, लोकांचा आक्रोश अन् घर पडतानाचा व्हिडिओ

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT