KL Rahul
KL Rahul Saam TV
क्रीडा | IPL

IND vs BAN, 1st ODI : केएल राहुलची एक चूक अन् तिथेच टीम इंडियानं मॅच गमावली, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

साम टिव्ही ब्युरो

IND vs BAN, 1st ODI : बांगलादेशने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशने अवघ्या एका विकेटने हा सामना जिंकला. कॅचेस विन मॅचेस म्हणतात.

मात्र केएल राहुलने एक महत्त्वपूर्ण कॅच सोडली आणि भारताने सामना गमावला. बांगलादेशला विजय मिळवून देणाऱ्या मेहिदी हसनची कॅच केएल राहुलने ड्रॉप केली. (Sports News)

बांगलादेशच्या 43 व्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत होता. या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर मेहिदी हसनने एक फटका मारला आणि चेंडू हवेत गेला. यावेळी विकेट कीपिंग करत असलेला केएल राहुल चेंडूखाली पोहोचला मात्र एक सोपा कॅच त्याने सोडला. मेहिदी हसनने केएल राहुलच्या या चुकीचा पुरेपूर फायदा उठवत संघाला विजय मिळवून दिला. मेहदी हसनने 39 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या.  (Latest Marathi News)

राहुलने ही कॅच घेतली असती तर बांगलादेशचा संघ ऑलआऊट झाला असता आणि टीम इंडियाला सामना सहज जिंकता आला असता. मात्र राहुलने कॅच ड्रॉप केल्यानंतर मेहिदी हसन आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी शेवटच्या विकेटकसाठी 51 धावांची निर्णायक भागिदारी केली.

पहिली फलंदाजी करताना भारतीय संघाने अवघ्या 186 धावा केल्या. मात्र यानंतरही भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मात्र बांगलादेशी खेळाडूंनी टीम इंडियाला विजयापासून दूरच ठेवलं. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

Live Breaking News: धाराशिव जिल्ह्यातील मतदान केंद्रावर अजूनही मतदान सुरूच

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT