IND vs BAN Credit- ICC Twitter
Sports

IND vs BAN: भारताचा हातातोंडाशी आलेला विजय हिरावला, शेवटच्या क्षणी मुस्तफिजूर-मेहदी हसनची चिवट खेळी

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

IND vs BAN 1st ODI : टीम इंडियाचा हातातोंडाशी आलेला विजय बांगालदेशच्या मेहदी हसन आणि मुस्तफिजूर रहमानने हिरावला. अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशने भारतावर एका विकेटने मात केली. बांगलादेशला विजयसाठी 40 धावा शिल्लक असताना 9 खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र तेथूनही मेहदी हसन आणि मुस्तफिजूरने विजय खेचून आणला.

पहिली फलंदाजी करताना भारतीय संघाने अवघ्या 186 धावा केल्या. मात्र यानंतरही भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मात्र बांगलादेशी खेळाडूंनी टीम इंडियाला विजयापासून दूरच ठेवलं. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. (Sports News)

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 41.2 षटकात 186 धावांवर गारद झाला. केएल राहुलने सर्वाधिक 73 धावा केल्या. प्रत्युत्तरात एकेकाळी टीम इंडिया मजबूत स्थितीत होती. त्याने बांगलादेशचे 136 धावांवर नऊ गडी बाद केले होते.

मात्र, यानंतर भारतीय संघाने मैदानावर मोठ्या चुका केल्या आणि सामना हातातून निसटलला. बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरलेल्या मेहदी हसन मिराजचा केएल राहुलने सोपा कॅच सोडला. याचा फायदा घेत मिराज आणि मुस्तफिझूर रहमान यांनी 10व्या म्हणजेच शेवटच्या विकेटसाठी नाबाद 51 धावांची भागीदारी केली.

मिराजने आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. तो 39 चेंडूत 38 धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी मुस्तफिझूर नऊ धावा करून नाबाद राहिला. या विजयासह बांगलादेशने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT