Pele Health Latest Update: महान फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती खालावली, जगभरातून प्रार्थना

ब्राझीलला ३ वर्ल्डकप विजेतेपद मिळवून देणारे महान फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती ढासळल्याचं वृत्त आहे.
Pele Health Latest Update
Pele Health Latest UpdateSAAM TV
Published On

Pele Health Latest Update News : कतारमध्ये फीफा वर्ल्डकप २०२२ मध्ये रोमांचक लढतींचा आनंद लुटत असताना फुटबॉलप्रेमी आणि फुटबॉल विश्वाला चिंतेत टाकणारं वृत्त येऊन धडकलं आहे. महान खेळाडू ब्राझीलचे माजी दिग्गज स्ट्रायकर पेले यांची प्रकृती ढासळली आहे. रिपोर्टनुसार, कॅन्सरवर उपचारासाठी सुरू असलेल्या केमोथेरपीलाही ते प्रतिसाद देत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पेले यांना सध्या पॅलिएटिव्ह केअरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तेथे ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. जगभरातील फुटबॉलप्रेमी आणि चाहते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

८२ वर्षीय पेले यांना मंगळवारी २९ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी काळजीचं कारण नाही, असं त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं होतं. रुग्णालयात ट्युमर काढण्यात आल्यानंतर केमोथेरपी सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यांना पुन्हा साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असून, ते रुग्णालयात उपचार घेतील, असं सांगण्यात आलं होतं. (Pele Health Update)

Pele Health Latest Update
Ricky Ponting: लाईव्ह मॅचदरम्यान रिकी पाँटिंगची तब्येत अचानक बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल

रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं की, केमोथेरपीला ते प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळं त्यांना तात्काळ पॅलिएटिव्ह केअरमध्ये ठेवण्यात आलं आहे, असं वृत्त आहे.

पेले यांनी १९५८, १९६२ आणि १९७० मध्ये ब्राझीलला विश्वकप विजेतेपद जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांनी ब्राझीलकडून ९२ सामने खेळले असून, ७७ गोल डागले होते. ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल डागणारे खेळाडू म्हणून त्यांना ओळखले जाते. (Latest Marathi News)

Pele Health Latest Update
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का; दिग्गज खेळाडू संघाबाहेर

फीफा वर्ल्डकप सुरू असतानाच पेले यांच्या प्रकृतीसंदर्भात आलेल्या वृत्तानं फुटबॉल विश्वाला चिंतेत टाकलं आहे. महान फुटबॉलपटूच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी जगभरातील चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. 'किंगसाठी प्रार्थना,' असं ट्विट फ्रान्सचे स्टार खेळाडू किलियन एमबाप्पे यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com