IND vs AUS
IND vs AUS  Saam TV
क्रीडा | IPL

IND vs AUS WTC Final 2023 : WTC अंतिम सामन्यासाठी 2 पिच तयार; क्रिकेट इतिहासात असं पहिल्यांदाच का घडतंय?

साम टिव्ही ब्युरो

IND vs AUS WTC Final 2023 : ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघ सज्ज झाले आहे. आजपासून म्हणजे ७ जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ आमनेसामने असतील. मात्र सामन्यावर पावसासोबतच आणखी एक संकट घोंगावत आहे.

माहितीनुसार, ओव्हल स्टेडियम व्यवस्थापनाने WTC फायनलसाठी दोन खेळपट्या (Pitch) तयार केल्या आहेत. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या तेल आंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विरोध करणारे लोक खेळपट्टी उखडून टाकू शकतात अशी भीती ICC ला आहे.  (Latest Sports News)

त्यामुळे अशी परिस्थिती उद्धभवली तर दुसऱ्या खेळपट्टीवर सामना खेळवला जाऊ शकतो. ICC ने याबाबत म्हटलं की, टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपचा हा सामना असल्याने सर्व शक्यता लक्षात घेऊन पर्याय उपलब्ध केले आहे. सामन्याचा निकाल यावा अशी आमची इच्छा आहे. (WTC Final 2023)

इंग्लंडमध्ये आंदोलन कशासाठी?

सध्या इंग्लंडमध्ये 'जस्ट स्टॉप ऑइल'ची निदर्शने होत आहेत. या निदर्शनांअंतर्गत आंदोलक इंग्लंड सरकारच्या नवीन तेल, वायू आणि कोळसा प्रकल्पांना विरोध करत आहेत. सरकारने या प्रकल्पांशी संबंधित परवाने तातडीने रद्द करावेत, अशी त्यांची मागणी आहे. हे आंदोलक खेळपट्टीचे नुकसान करू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून आयसीसीने असा निर्णय घेतला आहे.  (IND vs AUS WTC Final)

इतिहासात पहिल्यांदाच घडतंय

एका सामन्यासाठी दोन खेळपट्ट्या बनवण्याची घटना क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असल्याची शक्यता आहे. सामन्यापूर्वी किंवा दरम्यान खेळपट्टीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम सामन्यावर असलेल्या संकटाची माहिती टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघांना दिली आहे. म्हणून सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना देखील केल्या जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

405 लिटरची बूट स्पेस, 19 Kmpl मायलेज, जबरदस्त आहे Renault ची ही 5 Seater Car

Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

kalyan Crime News : लग्नाला दिलेला नकार पोराला पचला नाही, रागाच्या भरात नको ते करून बसला!

SCROLL FOR NEXT