IND vs AUS WTC Final 2023 Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना ओव्हल येथे खेळवला जाईल. टीम इंडियाने या स्पर्धेच्या फायनलमध्ये (WTC Final) सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला असून ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच WTC फायनल खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवून ट्रॉफी उंचवण्याच्या उद्देशाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघ मैदानात उतरेल.
IPL 2023 चे सामने Jio Cinema ने मोबाईल फोनवर मोफत दाखवले होते. पण WTC चा हा अंतिम सामना फोनवर मोफत मिळणार नाही. हा सामना मोबाईलवर पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्रीप्शन आवश्यक असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा अंतिम सामना भारतातील टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तर तुम्ही मोबाइलवर डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅफवर हा सामना (WTC 2023 Final Live Streaming) पाहू शकता. मोबाईल फोनवर सामना पाहण्यासाठी चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रीफ्शन घ्यावे लागणार आहे.
डीडी स्पोर्ट्सवरही पाहू शकता लाईव्ह सामना
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी स्पोर्ट्सवर देखील पाहू शकता. डीडीच्या फ्री टू एअर चॅनलवरही हा सामना पाहाता येईल. डीडी इंडियाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. यासाठी तुम्हाला डीडी स्पोर्ट्स १.० (फ्री डिश) आणि डीडी भारती १.० (फ्री डिश) चॅनेल सर्च करावे लागले. या चॅनल्सवर तुम्ही सामन्याचा मोफत आनंद घेऊ शकता.
भारतीय वेळेनुसार कधी सुरू होईल सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान खेळवला जाईल. या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. हा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. (IND vs AUS WTC Final)
WTC फायनलसाठी दोन्ही संघांचे खेळाडू:
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, सीईओ राजकुमार, उमेश यादव , जयदेव उनाडकट. (WTC Final 2023)
स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगल्स (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी , स्टीव्हन स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर. (Latest Sports News)
स्टँडबाय खेळाडू: मिचेल मार्श, मॅट रेनशॉ.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.