Rohit Sharma Injured: दुखापतग्रस्त रोहित शर्मा अंतिम सामन्यातून बाहेर पडल्यास कोण असेल कर्णधार?

Rohit Sharma Injury Updates: भारतीय चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे.
Rohit Sharma Injury Updates
Rohit Sharma Injury Updatessaam tv
Published On

WTC Final Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर हा सामना खेळवला जाईल. या सामन्यात विजय मिळवून अजिंक्यपद आपल्या नाववर करण्यासाठई दोन्ही संघांतील खेळाडू कसून सराव करत आहेत.

उद्यापासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. परंतु त्यापूर्वी भारतीय चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे.

Rohit Sharma Injury Updates
Rohit Sharma Injury: टीम इंडियाला मोठा धक्का! कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त; WTC फायनल खेळणार का?

फायनलपूर्वी टीम इंडियाला धक्का

WTCच्या अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघापुढील अडचणी वाढल्या आहेत. याआधी इशान किशन देखील सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर आता रोहितच्या हाताला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. त्याच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. ही दुखापत गंभीर नसल्याचं म्हटलं जात आहे, त्यामुळे तो उद्या होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो, ही एक दिलासादायक बाब आहे. परंतु रोहित उद्याचा सामना खेळू शकला नाही, तर संघाची धुरा कोणाच्या खांद्यावर असेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या खेळाडूवर येणार जबाबदारी

अशा परिस्थितीत रोहित शर्माला दुखापत झाल्यास संघाचा उपकर्णधार चेतेश्वर पुजारा त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. अलीकडेच त्याने कौंटी क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे आणि सध्या तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यान रोहित शर्मा जेव्हा जेव्हा मैदानाबाहेर जायचा तेव्हा तो संघाचं नेतृत्व करताना दिसला आहे. याआधीही पुजाराने आपल्या कर्णधार कौशल्याची झलक दाखवली आहे. (Latest Sports News)

Rohit Sharma Injury Updates
WTC Final 2023: विराट कोहली क्रिकेट विश्वात रचणार इतिहास! फायनलमध्ये 'महाविक्रमा'ला घालणार गवसणी

काउंटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी

भारतात आयपीएलचा महासंग्राम सुरु असताना चेतेश्वर पुजारा काउंटी क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत होता. पुजाराने काऊंटी क्रिकेटमध्ये ससेक्स संघाचे नेतृत्व करताना मोठ्या प्रमाणात धावा केल्या आहेत. पुजाराने ससेक्ससाठी 6 सामने खेळले असून त्यात त्याने 3 शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्याचबरोबर त्याने काउंटी क्रिकेटमध्ये एकूण 545 धावा केल्या आहेत. (Latest WTC Final Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com