team india twitter
Sports

Ind vs Aus Final Match: भारताचं ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य ; शमीची‌ जादू चालणार का? वर्ल्डकप फायनल कोण जिंकणार?

India vs Australia LIVE: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs Australia ,World Cup Final 2023:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला २४० धावा करता आल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी .. धावांची गरज. ..

हा सामना सुरु होण्यापूर्वी नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र नाणेफेक झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली होती. रोहितने फलंदाजीला येताच आक्रमक सुरुवात केली. मात्र त्याला शुभमन गिलची हवी तशी साथ मिळाली नाही.

गिल अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. रोहितने आक्रमण सुरु ठेवलं, मात्र तो अवघ्या ४७ धावा करत माघारी परतला. गेल्या सामन्यातील शतकवीर श्रेयस अय्यरकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याला ही मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. (Latest sports updates)

विराट अन् राहुलचं अर्धशतक...

भारतीय संघाचा डगमगलेला डाव विराट अन् राहुलने मिळून सावरला. दोघांनी मिळून या डावात महत्वपूर्ण भागीदारी केली. विराट कोहलीने या डावात ६३ चेंडूंचा सामना करत ५४ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार मारले. तर केएल राहुलने या सामन्यात १०७ चेंडूंचा सामना करत ६६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुख्य बाब म्हणजे त्याने या खेळीदरम्यान केवळ १ चौकार मारला. तर ६२ धावा या धावून पूर्ण केल्या आहेत.

हा सामना जिंकायचा असेल तर भारतीय गोलंदाजांना चांगली सुरुवात करुन द्यावी लागणार आहे. भारतीय संघात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहसारखे गोलंदाज आहेत. जे ऑस्ट्रेलियान फलंदाजांच्या अडचणीत वाढ करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT