team india saam tv new
Sports

Rohit Sharma Statement: 'इथंच आमचं चुकलं..' फायनल गमावल्यानंतर निराश झालेल्या रोहितने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

India vs Australia, World Cup 2023 Final: या सामन्यानंतर रोहितने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

India vs Australia, World Cup 2023:

भारतीय संघाचा विजयरथ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या फायनलमध्ये जाऊन थांबला. फायनलमध्ये भारतीय संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटक अखेर २४० धावा केल्या होत्या.

या डावात विराट कोहली आणि केएल राहुलला सोडलं तर कुठल्याही फलंदाजाला ५० धावांचा आकडा पार करता आला नाही. या धावांचा पाठलाग करताना ट्रेविस हेडच्या १३७ आणि मार्नस लाबुशेनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. दरम्यान या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने पराभवाची कारणं सांगितली आहेत.

या सामन्यात झालेल्या पराभवानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ' आज निकाल आमच्या बाजूने लागला नाही. मला मान्य आहे की, आम्ही चांगलं खेळलो नाही तरीदेखील मला माझ्या संघावर अभिमान आहे. खरं सांगू तर आम्ही २०-३० धावा कमी पडलो. जेव्हा विराट आणि राहुल फलंदाजी करत होते त्यावेळी आम्ही २७०-२८० चा विचार करत होतो. मात्र त्यानंतर विकेट्स गेल्या.' (Rohit Sharma Statement)

ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीबद्दल बोलताना तो म्हणाला की, ' सुरुवातीचे ३ विकेट्स गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाने मोठी भागीदारी केली. २४० धावांचा बचाव करताना आम्हाला सुरुवातीला विकेट्स हव्या होत्या. आम्ही ते करूनही दाखवलं. विजयाचं श्रेय ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेनला जातं. या दोघांनी मिळून मोठी भागीदारी केली आणि आम्हाला सामन्यातून बाहेर काढलं. आमच्याकडून जे शक्य होतं. आम्ही ते सर्व केलं.' (Latest sports updates)

तसे खेळपट्टीबाबत बोलताना तो म्हणाला की, ' मला असं वाटलं की, अंडर लाइट्स ही खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य होती. आम्हाला हे माहीत होतं की, अंडर लाइट्स फलंदाजी करणं सोपं जाईल पण आम्हाला आता कुठलंही कारण द्यायचं नाही. आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो आणि मोठी धावसंख्या उभारू शकलो नाही. आमच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीलाच ३ विकेट्स काढून दिल्या. जर आम्ही अजून १ विकेट घेतला असता तर आम्ही चित्र काही वेगळं असू शकलं असतं. या विजयाचं श्रेय हेड आणि लाबुशेनला जातं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT