narendra modi saam tv news
क्रीडा

IND vs AUS, World Cup 2023 Final: टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्वत: नरेंद्र मोदी उपस्थित राहणार!

Ankush Dhavre

Team India World Cup Final 2023:

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या फायनलचा थरारा रंगणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे.

हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजेरी लावणार आहेत. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाहा देखील हा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजेरी लावणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनलचा थरार पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि रिचर्ड मार्ल्स यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र अजुनही त्यांचा होकार आलेला नाही. (Narendra Modi Stadium)

दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर भारतीय संघाने चौथ्यांदा वर्ल्डकप स्पर्धेची फायनल गाठली आहे.

भारतीय संघाचा फायनलमध्ये प्रवेश..

भारतीय संघाने न्यूझीलंडला ७० धावांनी धुळ चारत वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३९७ धावा केल्या होत्या.या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव ३२७ धावांवर संपुष्टात आला. (Cricket World Cup)

फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे भारतीय संघाच्या विजयाचे हिरो ठरले. तर गोलंदाजीत मोहम्मद शमी या सामन्याचा हिरो ठरला. शमीने गोलंदाजी करताना ७ गडी बाद केले. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर विजय...

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २१३ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना डेव्हिड मिलरने शतकी खेळी केली. या धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ७ गडी बाद ४७.२ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT