स्मृती मानधनाचं ५० चेंडूत शतक; विराट कोहलीचा विक्रम मोडला
खेळीत १४ चौकार आणि ४ षटकार; विक्रमी पराक्रम
बेथ मूनीने १३८ धावा करून ऑस्ट्रेलियासाठी मोठं आव्हान उभं केलं
भारत-ऑस्ट्रेलिया महिला वनडे मालिका रंगात
ऑस्ट्रेलियाने केलेल्या ४१३ धावांच्या भल्यामोठ्या लक्ष्यासमोर खेळताना खचून न जात भारताची सलामीवीर स्मृती मान्धनाने तिसऱ्या वनडेत ५० चेंडूत शतकी खेळी यशस्वीरित्या पार पाडली आहे. स्मृतीने १४ चौकार आणि ४ षटकारांसह विक्रमी शतक केलं. स्मृतीचं वनडेतलं हे १३वं शतक असून महिला क्रिकेटमध्ये वनडे प्रकारातलं हे दुसरं वेगवान शतक आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगने ४५ चेंडूत शतक झळकावलं होतं. भारतीय महिला क्रिकेटपटूने झळकावलेलं हे सगळ्यात वेगवान शतक आहे.
काही दिवसांपूर्वी या मालिकेतल्या मुल्लापूर इथे झालेल्या दुसऱ्या वनडेत स्मृतीने ११७ धावांची शतकी खेळी केली होती. तोच फॉर्म कायम राखत स्मृतीने आणखी एकदा दणदणीत शतक झळकावलं. तीन सामन्यांची मालिका १-१ अशा स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा मालिका जिंकण्याचं आव्हान भारतीय संघासमोर आहे.
डावखुऱ्या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त ५० चेंडूत शतक पूर्ण केले, लेग साईडला एक जबरदस्त षटकार मारला. मिडविकेटवरून मारलेल्या या फटकाने तिने विराट कोहलीचा विक्रम मोडला, ज्याने १० वर्षांहून अधिक काळ भारतीय क्रिकेटपटू म्हणून सर्वात जलद शतकाचा विक्रम केला होता.
दिल्लीतल्या अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४१२ धावांची मजल मारली. बेथ मूनीने २३ चौकार आणि एका षटकारासह ७५ चेंडूत १३८ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. जॉर्जिया वॉलने ८१ तर एलिसा पेरीने ६८ धावांची खेळी करत बेथला चांगली साथ दिली. भारतातर्फे अरुंधती रेड्डीने ३ तर रेणुका सिंग आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.