IND VS AUS SAAM TV
क्रीडा

IND VS AUS :बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या वेळापत्रकात महत्वाचा बदल! धर्मशाळा नव्हे तर 'या' मैदानावर रंगणार तिसरा कसोटी सामना

मालिकेतील दुसरा कसोटी सामना १७ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने मालिकेच्या वेळापत्रकात एक महत्वाचा बदल केला आहे.

Saam TV News

IND VS AUS Test Series: सध्या भारत विरुद्व ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवत मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना १७ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने मालिकेच्या वेळापत्रकात एक महत्वाचा बदल केला आहे.

ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना धर्मशाळा येथे पार पडणार होता. मात्र हा सामना आता इंदोरच्या मैदानावर खेळवला जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. हा सामना १ मार्च ते ५ मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. (Latest Sports Updates)

बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. त्यांना लिहिले की, 'भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना १ मार्च ते ५ मार्च दरम्यान एचपीसीए धर्मशाळा येथे खेळवला जाणार होता.

मात्र हा सामना इंदोर येथील आहिल्याबाई होळकर स्टेडियमवर पार पडणार आहे.' धर्मशाळाचे मैदान सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार नसल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

असे आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे अपडेटेड वेळापत्रक

दुसरा कसोटी सामना - १७ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी, दिल्ली

तिसरा कसोटी सामना - १ मार्च ते ५ मार्च, इंदोर

चौथा कसोटी सामना - ९ मार्च ते १३ मार्च, अहमदाबाद

या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने आइस्ट्रेलिया संघाला धूळ चारत १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला.

यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण ही मालिका जिंकताच भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

SCROLL FOR NEXT