Ind Vs Aus Match Highlights Saam tv
Sports

Ind Vs Aus Match Highlights : विराटची संयमी खेळी ते हार्दिकची हार्ड हिटिंग, ही आहेत भारताच्या विजयाची प्रमुख कारणे

Ind vs Aus Semi Final : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या फायनलमध्ये भारताने धडक मारली आहे. भारताने ४ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. टीम इंडियाच्या विजयाची प्रमुख कारणे कोणती ? वाचा..

Yash Shirke

Ind Vs Aus Semi Final Highlights : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला. या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयाने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे. भारतीय संघाने आजच्या सामन्यात चांगला खेळ केला. दरम्यान या कारणांमुळे भारताचा विजय निश्चित झाला.

१. विराट कोहलीची खेळी

शुबमन गिल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीने संघाची जबाबदारी उत्तमरित्या पेलावली. त्याने ९८ चेंडूंमध्ये ८४ धावा केल्या. ज्यावेळी संयम बाळगून खेळण्याची गरज होती, तेव्हा विराटने त्या हिशोबाने खेळ केला. त्याचे शतक फक्त १६ धावांनी हुकले. विराटच्या या खेळीमध्ये भारताला भक्कम पाठबळ मिळाले.

२. भारताची भेदक गोलंदाजी

ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्यांना वेळोवेळी धक्के दिले. त्यातही मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती यांनी ऑस्ट्रेलिया संघाची कंबर मोडली. शमीने कूपर कॉनोली, स्टीव्ह स्मिथ आणि नॅथन एलिस यांना बाद केले. तर वरुण चक्रवर्तीने ट्रॅव्हिस हेड, बेन द्वारशुइस यांची विकेट घेतली. जडेजाने मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस यांना बाद केले.

३. मध्यम फळीतील फलंदाजांचे योगदान

शुबमन गिल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीवर जबाबदारी आली. त्याने श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांच्या साथीने भारताचा विजय निश्चित केला. मध्यम फळीने योग्य वेळी योग्य खेळ केल्याने भारताला हा सामना जिंकता आला. ज्यावेळेस विराट एका बाजूने संयमी पद्धतीने खेळत होता. दुसऱ्या बाजूने अय्यर, अक्षर, हार्दिक हे तुफान खेळ करत धावा करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

Gold Jewellery: सोनार गुलाबी रंगाच्या कागदात सोने गुंडाळून का देतो? यामागचं कारण काय?

Diabetes Diet: इडली, डोसा डायबेटिस पेशंटसाठी चांगला की वाईट? सोप्या ब्रेकफास्ट टिप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

SCROLL FOR NEXT