mohammed siraj twitter
Sports

IND vs AUS: मियां मॅजिक! ओव्हर संपताच बेल्सची अदला-बदली; अन् पुढच्याच षटकात लाबुशेनला धक्काच बसला

Mohammed Siraj Viral Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज हा नेहमीच चर्चेत असतो. गोलंदाजी असो की फलंदाजी, मैदानात असो की मैदानाबाहेर, सिराजची चर्चा झाल्याशिवाय एकही सामना होत नसतो.

ॲडलेड कसोटीत तो ट्रेविस हेडसोबत भिडताना दिसून आला होता. मात्र यावेळी तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आधी ट्रेविस हेड आणि आता तो मार्नस लाबुशेनसोबत भिडताना दिसून आला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या दिवशी मजेशीर घटना पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असलेला सिराज आपलं षटक संपलवल्यानंतर लाबुशेनच्या दिशेने गेला.

त्यानंतर त्याने स्टंपची बेल्स अल्टी पल्टी केली. हे लाबुशेनला मुळीच आवडलं नाही. त्यावेळी लाबुशेनने सिराजला विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र सिराज तिथून निघून गेला. त्यानंतर शुभमन गिलने सिराजच्या खांद्यावर हात ठेवला आणि दोघेही निघून गेले.

सिराजची जादू कामी आली..

सिराजने बेल्स अल्टी पल्टी केल्यानंतर लाबुशेन परत आला आणि त्याने बेल्स आधी जशी होती तशीच ठेवली. मात्र याचा काहीच फायदा झाला नाही. सिराजला जे करायचं होतं ते पूर्ण झालं. कारण पुढच्या षटकात नितीश कुमार रेड्डी गोलंदाजीला आला आणि त्याने या षटकात लाबुशेनची विकेट मिळवली.

नितीश रेड्डीने टाकलेला चेंडू हा लाबुशेनच्या बॅटची कडा घेत, स्लीपमध्ये असलेल्या विराट कोहलीच्या हातात गेला. सिराजने जे काही केलं होतं. त्यामुळे लाबुशेन ची नजर हटली होती. नजर हटताच दुर्घटना घडली. सिराजने त्याची एकाग्रता भंग केली होती. याचा फायदा नितीश रेड्डीला झाला. त्याने लाबुशेनला ५५ चेंडूत १२ धावांवर माघारी धाडले.

लाबुशेनला या मालिकेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या मालिकेत त्याला केवळ एकदाच ५० धावांचा आकडा गाठता आला आहे. पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना त्याक २ आणि ३ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याने ६४ धावांची खेळी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT