वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. जे आतापर्यंत विराट कोहली आणि एमएस धोनीलाही नाही जमलं ते रोहित शर्मा करू शकतो. (India vs Australia Final)
वर्ल्डकप फायनलच्या इतिहासात कुठल्याही भारतीय कर्णधाराला शतक झळकावता आलेलं नाही. या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय कर्णधार रोहित शर्माने १० सामने खेळले आहेत. यादरम्यान १ शतक आणि ३ अर्धशतक झळकावले आहेत. ५५० धावा करत तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पाचव्या स्थानी आहे. (Rohit sharma record)
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत तो तुफान फॉर्ममध्ये आहे. या स्पर्धेत त्याने वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याच्या रेकॉर्ड मोडून काढला आहे. तसेच नेतृत्वाच्या बाबतीतही रोहित शर्मा सुपरहिट ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाही.
कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी..
वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या नावावर आहे. या सामन्यात फलंदाजी करत असताना एमएस धोनीने ९१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. या सामन्यात गौतम गंभीरने ९७ धावांची महत्त्वपूर्ण खेकी केली. हा सामना जिंकून भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली होती. (Latest sports updates)
भारत ऑस्ट्रेलिया येणार आमने सामने..
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. भारतीय संघाने पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवला तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. भारतीय संघाला २००३ मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी असणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.