Chetshwar Pujara As Commentator In Border Gavaskar Trophy: चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी संघातील प्रमुख फलंदाज होता. मात्र आता त्याला संघात स्थान मिळणंही कठीण झालं आहे. भारतीय संघ बॉर्डर- गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र या दौऱ्यासाठी चेतेश्वर पुजाराला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
दरम्यान आगामी बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत तो नव्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेसाठी त्याची समालोचक म्हणून निवड झाली आहे.
चेतेश्वर पुजारा या मालिकेत हिंदी भाषेत समालोचन करताना दिसून येणार आहे. या मालिकेत पहिल्यांदाच असं घडणार आहे की, ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या लोकांना हिंदी समालोचनाचा आनंद घेता येणार आहे. या मालिकेचे ब्रॉडकास्टींग हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. मात्र स्टार स्पोर्ट्ससोबत टायअप करुन चॅनेल ७ च्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांनी हिंदी समालोचनाचा आनंद घेता येईल.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात पुजारा तर दिसेल. मात्र तो क्रिकेटच्या मैदानावर नसेल. तो समालोचन कक्षात आपला अनुभव सांगताना दिसेल.
बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत सुपरहिट
गेल्या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत केलंय. या विजयात पुजाराचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्याने मैदानावर टिचून फलंदाजी करुन गोलंदाजांना रडवलं होतं. २०१८-१९ मध्ये झालेल्या मालिकेत त्याने ५२१ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०२०-२१ मध्ये झालेल्या मालिकेत त्याने २७१ धावा चोपल्या होत्या.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकिपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्म सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.