rishabh pant twitter
Sports

IND vs AUS: रिषभची 'पंत'गिरी! स्टार्क - कमिन्सला दिवसा दाखवल्या चांदण्या, ठोकलं विक्रमी अर्धशतक

Rishabh Pant Record Breaking Half Century: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात रिषभ पंतने रेकॉर्डब्रेक अर्धशतकी खेळी केली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा थरार सिडनीच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव १८५ धावांवर आटोपला.

मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियावर दबाव बनवत ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांवर संपुष्टात आणला. यासह भारतीय संघाने या डावात ४ धावांनी आघाडी घेतली. दरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रिषभ पंतने रेकॉर्डब्रेक अर्धशतकी खेळी केली आहे.

रिषभ पंतच्या नावे रेकॉर्डची नोंद Rishabh Pant Record

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव १८५ धावांवर आटोपला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाला ४ धावांची आघाडी मिळाली. आघाडी मोठी नव्हती, पण ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलण्यासाठी ही आघाडी पुरेशी होती. ४ धावांची आघाडी घेऊन भारतीय संघाकडून केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांची जोडी मैदानावर आली.

जयस्वालने पहिल्याच षटकाच १६ धावा चोपत दमदार सुरुवात करुन दिली. जयस्वाल आणि राहुलने मिळून ४२ धावांची आक्रमक सुरुवात करुन दिली. त्यानंतर केएल राहुलन १३ धावांवर माघारी परतला.

राहुल पाठोपाठ जयस्वालनेही २२ धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली. या डावात विराट कोहली आणि गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र कोहली अवघ्या ६ आणि गिल १३ धावा करत माघारी परतला.

रिषभ पंतची रेकॉर्डब्रेक खेळी

सुरुवातीला ४ मोठे धक्के बसल्यानंतर, रिषभ आणि जडेजाने संघाचा डाव सांभाळला. जडेजाने एक बाजू धरुन ठेवली होती. तर रिषभ एक बाजूने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीचत धुलाई करत होता.

त्याने या डावात २९ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह हे त्याचं दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं आहे. यापूर्वी त्याने २०२२ मध्ये २८ चेंडूंचा सामना करत अर्धशतक पूर्ण केलं होतं. या यादीत कपिल देव तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांनी ३० चेंडूंचा सामना करत अर्धशतक पूर्ण केलं होतं.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारे फलंदाज (चेंडूंच्या बाबतीत)

रिषभ पंत- २८ चेंडू, २०२२

रिषभ पंत- २९ चेंडू, २०२५

कपिल देव- ३० चेंडू, १९८२

शार्दुल ठाकूर- ३१ चेंडू, २०२१

यशस्वी जयस्वाल - ३१ चेंडू, २०२४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

Pomegranate Vs Dragon Fruit : डाळिंब vs ड्रॅगन फ्रूट ? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

SCROLL FOR NEXT