shubman gill twitter
Sports

IND vs AUS: ...म्हणून शुभमन गिलला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवलं! खरं कारण आलं समोर

Shubman Gill, Team India Playing XI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. काय आहे, यामागचं कारण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना असणार आहे.

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यतकीत करणारा निर्णय घेतला आहे. या सामन्यात शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. आता गिलला संघाबाहेर ठेवण्याचं नेमकं कारण समोर आलं आहे.

गिल प्लेइंग ११ मधून बाहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीला आजपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यासाठी शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. या सामन्यात केएल राहुल सलामीला फलंदाजीला येणार असून रोहित शर्मा स्वत: तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार आहे.

तर त्याला संघाबाहेर करुन वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. गिलची कामगिरी पाहिली, तर २०२० नंतर त्याला परदेशात खेळताना एकही मोठी खेळी करता आलेली नाही. त्याची सरासरी केवळ २८.५ ची राहिली आहे.

या मालिकेतील पहिल्या कसोटीदरम्यान गिल दुखापतग्रस्त होता. त्यामुळे तो या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याने कमबॅक केलं. दुसऱ्या कसोटीत फलंदाजी करताना त्याने ३१ आणि २८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला अवघी १ धाव करता आली.

मेलबर्न कसोटीसाठी भारतीय संघ नव्या प्लानिंगसह मैदानात उतरला आहे. या सामन्यासाठी २ फिरकी गोलंदाजांना प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळेच गिलला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवण्यात आलं आहे.

सध्या ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं आहे.

मेलबर्न कसोटीसाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

SCROLL FOR NEXT