team india twitter
Sports

IND VS AUS 4th test: टीम इंडियाचा बॉर्डर- गावसकर ट्रॉफीवर कब्जा! २-१ ने मालिका घातली खिशात

भारतीय संघाने ही मालिका २-१ ने खिशात घातली आहे.

Ankush Dhavre

Ind vs aus 4th test result: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामान्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना पार पडला. हा सामना अनिर्णित राहिला आहे. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २ गडी बाद १७५ धावा केल्या. यासह भारतीय संघाने ही मालिका २-१ ने खिशात घातली आहे.

भारतीय संघाने उभारला ५७१ धावांचा डोंगर..

ऑस्ट्रेलिया संघाने केलेल्या ४८० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली होती. रोहित ३५ धावा करत माघारी परतला. मात्र शुभमन गिलने डाव सावरत १२८ धावांची खेळी केली.

तर सामन्याचा चौथा दिवस विराटने गाजवला. विराटने चौथ्या दिवशी फलंदाजी करताना करकीर्दीतील २८ वे शतक झळकावले.

त्याने या डावात १८६ धावांची खेळी केली. भारतीय संघ अडचणीत असताना अक्षर पटेलने जबाबदारी स्वीकारत ७९ धावांची खेळी केली.

या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उभारला ४८० धावांचा डोंगर..

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. ऑस्ट्रेलिया संघाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १८० धावांची खेळी केली.

तर कॅमरुन ग्रीनने ११४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी खालच्या फळीतील फलंदाजांनी देखील मोलाचे योगदान दिले. शेवटी टॉड मर्फीने ४१ आणि लायनने ३१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावांचा डोंगर उभारला होता.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या १७५ धावा..

पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाज जोरदार कमबॅक करतील असे वाटत असताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानी टिचून फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेवीस हेडने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने नाबाद ६३ धावांची खेळी केली. हा सामना ड्रॉ झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT