Usman khawaja
Usman khawaja Twitter
क्रीडा | IPL

Ind vs Aus 4th test: भारतीय गोलंदाज दमले...उस्मान ख्वाजाचं शतक; ऑस्ट्रेलियानं पहिला दिवस गाजवला, बघा स्कोअरकार्ड...

Ankush Dhavre

Ind vs Aus 4th test day 1: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी योग्य ठरवला आहे. कारण पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया संघाने ४ गडी बाद २५५ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाची जोरदार सुरुवात..

या सामन्याच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गोलंदाजांवर दबाव टाकल्याचे पाहायला मिळाले होते. सलामीला आलेल्या ट्रेवीस हेडने ३२ धावांची खेळी केली होती. तर स्टीव्ह स्मिथने ३८ आणि पीटर हॅन्ड्सकॉंबने १७ धावांची खेळी केली.

तसेच उस्मान ख्वाजा १०४ धावांची तर कॅमरुन ग्रीन ४९ धावांवर नाबाद आहे. दुसऱ्या दिवशी दोघेही मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने ६५ धावा खर्च करत २ गडी बाद केले. तर आर अश्विनने ५७ धावा खर्च करत १ आणि रवींद्र जडेजाने ४९ धावा खर्च करत १ गडी बाद केला. सामान्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्ठात आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत :

रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल,चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया :

उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पिटर हँड्सकाँब, कॅमरन ग्रीन, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुन्हेमन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनाक्षी सिन्हाच्या 'हिरामंडी'ची चाहत्यांना भुरळ, अभिनयाची होतेय चर्चा

Today's Marathi News Live : मुंबईतील खार दांडा परिसरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमने-सामने

Delhi Metro: अगोदर बाचाबाची मग थेट हातच उचलला; मेट्रोमध्ये जोडप्याचं कडाक्याचं भांडण, VIDEO व्हायरल

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Rohit Pawar News | अजित पवारच नाटकं करतात, रोहित पवारांचा घणाघात

SCROLL FOR NEXT