team-india saam tv news
क्रीडा

IND vs AUS: पराभवानंतर टीम इंडियात होणार मोठे बदल! धाकड खेळाडूच्या एन्ट्रीने फॉर्ममध्ये असलेला फलंदाज होणार बाहेर

India vs Australia, 4th T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा टी-२० सामना शुक्रवारी रायपुरमध्ये खेळवला जाणार आहे

Ankush Dhavre

Team India Playing XI:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा टी-२० सामना शुक्रवारी रायपुरमध्ये खेळवला जाणार आहे. ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे.

मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकण्याची संधी होती. मात्र ही संधी हुकली आहे. आता भारतीय संघाला ही मालिका जिंकण्यासाठी चौथा टी-२० सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल केले जाऊ शकतात.

सलामी जोडी...

या मालिकेत ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वालची जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येत आहे. या दोघांनी भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली आहे. दोघेही पावरप्लेच्या षटकात फटकेबाजी करण्यात तरबेज आहे. ही जोडी चौथ्या सामन्यातही भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते.

मध्यक्रमात होणार बदल..

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. त्यामुळे श्रेयस अय्यरचं कमबॅक झाल्यास तिलक वर्माला प्लेइंग ११ मधून बाहेर बसावं लागेल. कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तर फिनिशर म्हणून नावा रुपाला येत असलेला रिंकू सिंग या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. (Latest sports updates)

अष्टपैलू खेळाडू..

या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिले जाऊ शकते. वॉशिंग्टनचं कमबॅक झाल्यास अक्षर पटेलला विश्रांती दिली जाऊ शकते.

या गोलंदाजांना मिळू शकते संधी..

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात रवी बिश्नोईने दमदार खेळ केला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून ठेवलं होतं. या सामन्यात वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध कृष्णा, दिपक चहर आणि आवेश खानला संघात स्थान दिले जाऊ शकते.

चौथ्या टी-२० सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

ऋतुराज गायकवाड़, यशस्वी जयस्वाल/, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, रवी बिश्नोई, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT