Team-india google
Sports

Ind vs Aus 4th T20 Playing 11: रोहितच्या खास भिडूला सूर्यकुमार दाखवणार बाहेरचा रस्ता; अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Ind vs Aus 4th t20 latest updates: भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारतीय संघाला विजयी आघाडी घेण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Shreyas Iyer Comeback:

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्याचा थरार रायपूरच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली होती. तर तिसऱ्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारतीय संघाला विजयी आघाडी घेण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवला मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.

या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धावांचा बचाव करत विजय मिळवला.

मात्र तिसऱ्या सामन्यात २२२ धावांचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेलची बॅट तळपली. त्याने वादळी शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाची ताकद आणखी वाढणार आहे. कारण, वर्ल्डकप संघातील आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर या सामन्यातून कमबॅक करणार आहे. (Latest sports updates)

श्रेयस आल्यानंतर कोण होणार बाहेर?

श्रेयस अय्यरकडे उर्वरित २ सामन्यांसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार हे निश्चित आहे. आता श्रेयस अय्यर आल्यानंतर सूर्यकुमार यादव कोणाला बसवणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

गेल्या ३ सामन्यातील कामगिरी पाहता तिलक वर्मा हा एकमेव फलंदाज आहे ज्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे दाट शक्यता वर्तवली जात आहे की, श्रेयस अय्यर आल्यानंतर तिलक वर्माला विश्रांती दिली जाऊ शकते.

तिलक वर्माला या मालिकेतील २ सामन्यांमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरसाठी तिलकचा पत्ता कट केला जाऊ शकतो. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यो दोघांनी मिळून संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. तर इशान किशन आणि रिंकू सिंग देखील तुफान फॉर्ममध्ये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT