Team India
Team India Saam Tv
क्रीडा | IPL

Team India: इंदूर कसोटीनंतर एका भारतीय खेळाडूचं करिअरही संपणार? सुमार कामगिरीमुळे सगळेच नाराज

साम टिव्ही ब्युरो

IND vs AUS 3rd Test: इंदूर येथील तिसऱ्या कसोटीत भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. आजच्या सामन्यासह एका खेळाडूचं करिअर देखील संपण्याची चिन्ह आहे. टीम इंडियासाठी या खेळाडूनं संधी मिळूनही अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे.त्यामुळे या खेळाडू प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. अनेकजण या खेळाडूला पुन्हा संधी देऊ नये असं म्हणत आहेत.

विकेटकीपर फलंदाज केएस भरतला टीम इंडियातून पुढच्या कसोटीसाठी ड्रॉप केले जाऊ शकते. अहमदाबादमध्ये 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इशान किशनला संधी मिळू शकते. केएस भरत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर, दिल्ली आणि इंदूर येथे खेळल्या गेलेल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये सपशेल फ्लॉप ठरला आहे. त्याच्या ब‌टमधून अवघ्या 57 धावा निघाल्या. नागपूर, दिल्ली आणि इंदूर कसोटी सामन्यांच्या स्पिनर खेळपट्ट्यांवर केएस भरत विकेटकीपिंगदरम्यान देखील स्ट्रगल करताना दिसला.

इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात केएस भरतने केवळ 17 आणि 3 धावा केल्या. केएस भरतच्या फलंदाजीत एक्स फॅक्टरही नव्हता, ज्यामुळे ऋषभ पंत किंवा ईशान किशन सारख्या खेळाडूंची कमी भासली. ज्या क्रमांकावर केएस भरत मधल्या फळीत फलंदाजी करतो, तिथे टीम इंडियाला एका स्फोटक फलंदाजाची उणीव भासत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर, दिल्ली आणि इंदूर कसोटी सामन्यात केएस भरतने केवळ 8, 6, 23 (नाबाद), 17 आणि 3 धावा केल्या. पण टीम इंडियाला केएस भरतकडून आक्रमक यष्टीरक्षक फलंदाजीची गरज आहे. (Latest sports updates)

ईशान किशनचा बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी यष्टीरक्षक म्हणून टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंतच्या अपघातानंतर संघाला खालच्या मधल्या फळीत एका स्फोटक फलंदाजाची गरज होती. यामुळे ईशान किशनचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र पहिल्या 3 सामन्यात ईशान किशनला खेळण्याची संधी मिळाली नाही.

ईशान किशनच्या जागी केएस भरत खेळला. फलंदाजीत केएसची कामगिरी खूपच निराशाजनक होती. केएस भरतकडून अपेक्षित फलंदाजी करता आलेली नाही. यामुळे संघ व्यवस्थापन ईशान किशनला विकेटकीपर फलंदाज म्हणून संधी देऊ शकते.

ईशान किशनचा धमाकेदार खेळ पाहता त्याला केएस भरतपेक्षा पसंती मिळेल असे मानले जात आहे. अशा स्थितीत केएस भरतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागणार आहे. सहाव्या क्रमांकावर ईशान किशन टीम इंडियाची पहिली पसंती असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic News: पुण्यातील वाहतुकीत ४ मे पासून मोठे बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई

Raigad News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला; आमदार पुत्रासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

SCROLL FOR NEXT