team-india twitter/BCCI
क्रीडा

IND vs AUS: इथेच चूक झाली! काय आहे टीम इंडियाच्या पराभवाचं नेमकं कारण?

Ankush Dhavre

India vs Australia, 3rd T2OI:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने २२२ धावांचा डोंगर उभारला होता.

आव्हान तसं मोठं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने या धावांचा यशस्वी पाठलाग करत भारतीय संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय निश्चित दिसत होता. मात्र शेवटच्या षटकात सामना फिरला.

इथेच फिरला सामना...

शेवटच्या २ षटकापर्यंत भारतीय संघ आघाडीवर होता. कारण ऑस्ट्रेलियाला शेवटच्या १२ चेंडूंमध्ये विजयासाठी ४३ धावांची गरज होती. इथून भारतीय संघाचा विजय निश्चित दिसत होता. त्यावेळी ग्लेन मॅक्सवेल आणि मॅथ्यू वेड खेळपट्टीवर होते.

भारतीय संघाकडून १९ वे षटक टाकण्यासाठी अक्षर पटेल गोलंदाजीला आला होता. या षटकात मॅक्सवेल आणि वेडच्या जोडीने मिळून २२ धावा जोडल्या. शेवटच्या ६ चेंडूंवर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१ धावांची गरज होती. (Latest sports updates)

कर्णधार सूर्यकुमार यादवने शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी प्रसिद्ध कृष्णावर सोपवली. असं वाटलं होतं की,तो २१ धावांचा यशस्वीरीत्या बचाव करत संघाला विजय मिळवून देईल. मात्र असं काहीच झालं नाही.

प्रसिद्ध कृष्णाच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मॅथ्यू वेडने चौकार मारला. त्यानंतर त्याने पुढील चेंडूवर एक धाव घेत ग्लेन मॅक्सवेलला स्ट्राईक दिली. ग्लेन मॅक्सवेलने प्रसिद्ध कृष्णाच्या गतीचा पुरेपूर वापर केला. त्याने एक षटकार आणि पुढील सलग तीन चौकार मारुन ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ ने कमबॅक केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT