team india
team india file photo
क्रीडा | IPL

IND VS AUS: भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया अंतिम ODI सामना होणार रद्द? सामन्याच्या १ तासापुर्वी समोर आली मोठी अपडेट..

Ankush Dhavre

Ind vs aus 3rd odi: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला होता.

तर दुसऱ्या सामान्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार विजय मिळवत मालिका १-१ ने बरोबरीत आणली होती.

आता मालिकेतील अंतिम सामना चेन्नईच्या मैदानावर रंगणार आहे. मात्र हा 'करो या मरो' सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक सामना चेन्नईच्या मैदानावर रंगणार आहे. मात्र हा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सामन्यात पावसाचा कहर पाहायला मिळू शकतो. हा सामना दुपारी १:३० वाजता सुरु होणार आहे. (Latest sports updates)

मात्र चेन्नईमध्ये दुपारी १२ आणि ३ वाजण्याच्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पावसामुळे सामन्याचा बराच वेळ वाया जाऊ शकतो.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दुपारी १२ वाजता पाऊस पडण्याची शक्यता १६ टक्के आहे.

जसजसा दिवस पुढे जाईल तशी पाऊस पडण्याची शक्यता कमी होत जाणार आहे. मात्र मध्येच पडणाऱ्या पावसामुळे बराच वेळ सामना थांबवला जाऊ शकतो.

जर १२ च्या सुमारास पाऊस पडला तर नाणेफेकीसाठी देखील उशीर होऊ शकतो. तर ३ च्या सुमारास वातावरण ढगाळ असू शकते.

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकणाऱ्या संघाला मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ५ गडी राखून आपल्या नावे केला होता.

तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने १० गडी राखून विजय मिळवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election : ४० वर्षांच्या महिलेच्या ओळखपत्रावर मतदान करण्यासाठी आली 8 वीतील मुलगी, बोगस मतदानाचा Video आला समोर

Live Breaking News: त्या पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा आरोप

Pune PDCC Bank: मोठी बातमी! PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

SCROLL FOR NEXT