virat kohli twitter
Sports

Virat Kohli Record: ॲडिलेडच्या मैदानावर विराट रचणार इतिहास! ब्रायन लारा अन् विव रिचर्ड्सला मागे सोडणार

India vs South Australia 2nd Test, Virat Kohli Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला. यासह भारताने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

मालिकेतील दुसरा सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना डे- नाईट कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना गुलाबी चेंडूने खेळला जाईल. या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

मालिकेतील दुसरा सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. हे मैदान विराट कोहलीच्या आवडत्या मैदानांपैकी एक आहे. विराटने या मैदानावर फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला आहे.

गेल्या सामन्यात विराटने शानदार शतकी खेळी केली होती. त्यामुळे विराटचा फॉर्म परतला आहे. या सामन्यातही विराटची बॅट तळपली, तर तो मोठ्या रेकॉर्डमध्ये ब्रायन लारा आणि विव रिचर्ड्सला मागे सोडू शकतो.

विराटला गेल्या काही महिन्यांपासून एकही शतक झळकावता आलं नव्हतं. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने दमदार कमबॅक करत शानदार शतकी खेळी केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३० वे शतक ठरले.

या शतकासह तो ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतक झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला होता. त्याने ऑस्ट्रेलियात खेळताना ७ शतक झळकावली आहेत. तर सचिनने ६ शतकं झळकावली होती.

या सामन्यातही विराटची बॅट तळपली, तर तो विव रिचर्ड आणि ब्रायन लारा यांना मागे सोडू शकतो. अॅडिलेडच्या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये विव रिचर्ड अव्वल स्थानी आहेत.

त्यांच्या नावे ५५२ धावा करण्याची नोंद आहे. तर ब्रायन लारा यांच्या नावे ६१० धावा करण्याची नोंद आहे. विराटने या मैदानावर फलंदाजी करताना ५०९ धावा केल्या आहेत. त्यामुळे विव रिचर्ड यांना मागे सोडण्यासाठी त्याला अवघ्या ४४ धावा करायच्या आहेत. तर ब्रायन लारा यांना मागे सोडण्यासाठी १०२ धावा कराव्या लागणार आहेत.

अॅडिलेडमध्ये कसा राहिलाय विराटचा रेकॉर्ड?

अॅडिलेडच्या मैदानावर फलंदाजी करताना विराटचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. या मैदानावर फलंदाजी करताना त्याने ५०९ धावा केल्या आहेत. यादरम्याना त्याने ३ शतकं आणि १ अर्धशतक झळकावलं आहे. यादरम्यान १४१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT