rohit sharma Saam tv
क्रीडा

Team India Playing XI: रोहित In झाल्यानंतर कोण होणार Out? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

IND vs AUS 2nd Test, Team India Playing XI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीसाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११?

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेला भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी मोठा विजय मिळवला.

या सामन्यानंतर भारतीय संघासाठी गुड न्यूज समोर आली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असणार आहे. रोहित आल्यानंतर प्लेइंग ११ मध्ये बदल होणार, हे निश्चित आहे. दरम्यान कोण बाहेर होऊ शकतो? जाणून घ्या.

रोहित शर्माचं कमबॅक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माऐवजी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. या सामन्यात यशस्वी जयस्वालसोबत केएल राहुल डावाची सुरुवात करताना दिसून आला होता.

या सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुलची बॅट शांत राहिली. तर दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार कमबॅक केलं. त्याने सलामीला फलंदाजी करताना २०१ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर मोठं आव्हान ठेवलं.

रोहित आल्यानंतर कोण होणार बाहेर?

रोहित शर्मा आल्यानंतर भारतीय संघाचा फलंदाजी क्रम बदलेल. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करताना दिसतील. तर केएल राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. पहिल्या सामन्यात ध्रुव जुरेलला संधी दिली गेली होती. मात्र त्याला या संधीचा फायदा घेता आलेला नाही. त्यामुळे ध्रुव जुरेलला विश्रांती दिली जाऊ शकते.

केव्हा होणार सामना?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. हा डे नाईट कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना गुलाबी चेंडूने खेळला जाईल. डे- नाईट कसोटी सामना हा भारतीय संघासाठी मुळीच सोपा नसणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकही डे नाईट कसोटी सामना गमावलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT