yashasvi jaiswal twitter
Sports

IND vs AUS: स्टार्कने बदला घेतला! वेगाने बॉल आला अन् पहिल्याच बॉलवर जयस्वालची विकेट -VIDEO

Mitchell Starc Took Yashasvi Jaiswal Wicket: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत जयस्वाल गोल्डन डकवर बाद झाला आहे.

Ankush Dhavre

IND vs AUS 2nd Test, Yashasvi Jaiswal Wicket: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना अॅडलेडच्या मैदानावर सुरु आहे.

हा डे-नाईट कसोटी सामना असणार आहे. दरम्यान या सामन्यातील सुरुवातीला भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला आहे.

अॅडलेडच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सुरुवातीला भारताला मोठा धक्का बसला. भारतीय संघाकडून केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली.

दोघांकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती.मात्र पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर यशस्वी जयस्वाल पायचीत होऊन माघारी परतला.

पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पहिले षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला. स्टार्कने ओव्हर द विकेटचा मारा करत, लेग स्टम्पच्या लाईनवर बॉल टाकला. हा बॉल टप्पा पडताच आत सरळ राहिला आणि जयस्वालला वाटलं की बॉल स्विंग होऊन आत येईल, मात्र असं काहीच झालं नाही.

अंदाज चुकल्याने जयस्वालला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे. गेल्या काही वर्षांपासून रोहित शर्मा भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करतोय. मात्र गेल्या सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली होती. या सामन्यातही फलंदाजीक्रमात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.भाै

भारतीय संघ आघाडीवर

या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध नव्हता. त्याच्याऐवजी जसप्रीत बुमराह संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. या सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला होता.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघांची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT