Hardik Pandya Statement: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघामध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करतोय. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. रविवारी (६ ऑगस्ट) रोजी टी -२० मालिकेतील दुसरा टी -२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला २ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest sports updates)
सामना झाल्यानंतर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, ' खरं सांगायचं झालं तर, आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाही. आम्ही आणखी चांगली फलंदाजी करू शकलो असतो. आमची फलंदाजी अशी होती की, आम्ही १६०-१७० पर्यंत पोहचू शकलो असतो. तो (निकोलस पुरन) ज्याप्रकारे फलंदाजी करत होता, त्यामुळे आम्हाला फिरकी गोलंदाजांना रोटेट करणं कठीण होत होतं. त्याने अप्रतिम फलंदाजी करत सामना खेचून घेतला.'
तसेच तो पुढे म्हणाला की, 'सध्याचा संघ पाहता आम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी आम्हाला टॉप ७ फलंदाजांवर विश्वास ठेवावा लागेल. अशी आशा करतो की, आमचे गोलंदाज आम्हाला सामना जिंकवू देतील. आमचा संघ संतुलित आहे याची खात्री करून घेण्यासाठी आम्हाला मार्ग शोधावे लागतील. यासाठी फलंदाजांनी जबाबदारी घेऊन खेळणं गरजेचं आहे.'
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १५२ धावांचा डोंगर उभारला होता. या डावात तिलक वर्माने भारतीय संघाकडून सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मात्र निकोलस पुरनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर वेस्टइंडीज संघाला २ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.