IND vs Aus 1st Test  Saam TV
क्रीडा

Srikar Bharat Stumping : श्रीकर भरतने धोनी स्टाईलने उडवल्या बेल्स, लाबुशेन फक्त पाहातच राहिला

Satish Daud

IND vs Aus 1st Test Live Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिला सामना नागपूरच्या जामठा मैदानावर खेळवला जात आहे. फिरकी गोलंदाजांना अनुकूल मानल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जो त्यांच्या अंगलटी येताना दिसत आहे. कारण, आपल्या पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियन संघ बॅकफूटवर गेला आहे. (Latest Sports Update)

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजाची करताना चहापाण्यापर्यंत ६ गड्यांच्या मोबदल्यात १६८ धावा केल्या. यामध्ये त्यांनी डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुसेन यासारख्या तगड्या खेळाडूंना गमावलं आहे. भारताकडून पुनरागमन करणाऱ्या रविंद्र जडेजाने घातक गोलंदाजी करत ३ गड्यांना बाद केलं आहे.

दरम्यान, या सामन्यात पदार्पण करणारा भारतीय यष्टीरक्षक श्रीकर भरतने सुद्धा प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्याने रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर स्टंपमागे मार्नस लाबुशेनला शानदार पद्धतीने बाद केले. ज्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची (India vs Australia) सुरुवात खराब झाली. त्यांनी पहिल्या तीन षटकांतच उस्मान ख्वाज आणि डेव्हिड वार्नरला गमावले. त्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्मिथ यांनी मैदानावर जम बसवून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेट्साठी ८२ धावांची भागीदारी केली.

त्यांच्या भागीदारीमुळे बँकफूटवर गेलेला ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा ट्रॅकवर परतणार असं वाटत असतानाच, रविंद्र जडेजाने घातक गोलंदाजी करत ही जोडी फोडली. जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक श्रीकर भरतने मार्नस लाबुशेनला चपळाईने यष्टीरक्षण करत बाद केले. लाबूशेन ४९ धावा काढून बाद झाला.

लाबूशेन नंतर फलंदाजीसाठी उतरलेला मॅट रेनशॉला रवींद्र जडेजाने भोपळही फोडू दिला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३६ षटकानंतर ४ बाद ८४ झाली आहे. त्यानंतर अलेक्स कँरी आणि पिटर हँडस्कॉब यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आश्विनने ही जोडी फोडली. भारताकडून मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, आणि रविचंद्रन आश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर रविंद्र जडेजाने ३ फलंदाजांना माघारी पाठवले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT