ind vs aus twitter
Sports

IND vs AUS: पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होणार?

India vs Australia Match Timing: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा पहिला कसोटी सामना किती वाजता सुरु होणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

India vs Australia Schedule, Border Gavaskar Trophy: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२५ स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असलेली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर मालिका सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.

दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल झाले असून कसून सराव करायला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान हे सामने भारतात किती वाजता लाईव्ह पाहता येतील? जाणून घ्या.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा थरार २२ नोव्हेंबरपासून पर्थच्या WACA स्टेडियममध्ये रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार, सकाळी ७:५० वाजता सुरु होईल. तर सामन्याचा टॉस ३० मिनिटांपूर्वी म्हणजे ७:२० ला होईल.

पहिल्या सेशनबद्दल बोलायचं झालं, तर पहिला सेशन ७:५० ते ९:५० पर्यंत असेल. त्यानंतर लंच ब्रेक होईल आणि १०:३० ला दुसऱ्या सेशनला सुरुवात होईल. हा सेशन १२:३० पर्यंत सुरु राहिल. त्यानंतर टी ब्रेक होईल. त्यानंतर बरोबर २० मिनिटांनंतर म्हणजे १२:५० ला तिसऱ्या मिनिटाचा खेळ सुरु होईल. हा सेशन २:५० पर्यंत सुरु राहिल.

हा सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा पहिला कसोटी सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. यासह या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही डिस्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची मालिका

भारतीय संघाने गेल्या काही महिन्यांपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं होतं. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी घसरला आहे. आता भारतीय संघाचं फायनल गाठणं कठीण झालं आहे. कारण भारतीय संघाला जर फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर ऑस्ट्रेलियाला ४-० ने पराभूत करावं लागेल.

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सरफराज खान, विराट कोहली, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), के.एल. राहुल, हर्षित राणा, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.

ऑस्ट्रेलिया -पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिच मार्श, नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT